पैसे कसे येणार? लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी रखडली

19 Feb 2026 14:42:18
पिंपरी-चिंचवड,
Chief Minister Ladki Bahin Yojana स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे श्रेय सत्ताधारी पक्षांनी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेण्याच्या दृष्टीने अनेक महिला तांत्रिक पेचात अडकल्या आहेत. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ बंद होऊ शकतो, अशी भीती आहे.
 

Chief Minister Ladki Bahin Yojana 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोर्टलवर नवीन ई-केवायसीसाठीची सुविधा बंद असल्यामुळे फक्त आधीच्या अर्जात काही त्रुटी असलेल्या किंवा प्रक्रियेत अपयशी झालेल्या महिलांना दुरुस्तीची संधी दिली जात आहे. मात्र ज्या महिलांची ई-केवायसी अजून सुरूच झाली नाही, त्यांच्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
सुरुवातीस ओटीपी न Chief Minister Ladki Bahin Yojana  येणे, संकेतस्थळ सातत्याने हँग होणे आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिलांची ई-केवायसी अपूर्ण राहिली होती. प्रशासनाने ३१ डिसेंबर २०२४ ही अंतिम मुदत दिली होती, परंतु शेवटच्या टप्प्यात संकेतस्थळ अनेकदा बंद पडत असल्याने अनेक अर्ज पूर्ण होऊ शकले नाहीत. यानंतर जुन्या अर्जांसाठी दुरुस्तीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२५ पर्यंत दिली आहे.लाभार्थी महिला पूजा भोसले यांनी सांगितले की, “सायबर कॅफेमध्ये जाऊनही नवीन ई-केवायसी करता येत नाही, प्रशासनाने तांत्रिक अडचणीत अडकलेल्या बहिणींना मदतीचा हात देण्याऐवजी दरवाजेच बंद केले आहेत. प्रशासनाने आम्हाला लाभापासून लांब ठेवण्यासाठीच हा खेळ मांडला आहे का?”स्थानिक प्रशासनाकडून आकडेवारी मिळवण्याचा प्रयत्न केला असता, किती महिलांनी अर्ज केले, किती जणींची ई-केवायसी पूर्ण झाली आणि किती महिलांना प्रक्रियेतून वगळण्यात आले, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लाभार्थी महिलांसमोर केवायसी पूर्ण करण्याचा मार्ग अस्पष्ट राहिला आहे.या परिस्थितीमुळे अनेक महिला योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेऊ शकत नाहीत, आणि प्रशासनाकडून त्वरित उपाययोजना अपेक्षित आहे.
Powered By Sangraha 9.0