बांधकाम कामगार किट वाटपाचे तीनतेरा

लाभार्थ्यांचे कार्यालयात हेलपाटे

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
तिवसा,
construction worker kit शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना देण्यात येणार्‍या गृहपयोगी व सुरक्षा साहित्य किटच्या वाटपाचा तिवसा तालुक्यात बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. जिल्हाधिकार्‍यांनी तालुकास्तरावर नियोजन करून वाटप करण्याचे आदेश दिले असतानाही प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही सुरू नसल्याने शेकडो पात्र लाभार्थ्यांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
 
 
कॉन्स्ट्रुक्टन
 
पूर्वी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा येथे किट वाटपादरम्यान मोठी गर्दी होऊन गोंधळ निर्माण झाल्याने १३ फेब्रुवारी रोजी किट वाटप तात्पुरते बंद करण्यात आले होते. त्यानंतर तालुकास्तरावर नियोजनबद्ध वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र तिवसा येथे अद्याप वाटपाबाबत कोणतेही वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. तिवसा येथील बांधकाम कामगार कार्यालयात दररोज महिला, वृद्ध व ग्रामीण भागातील कामगार माहिती घेण्यासाठी येत आहेत. मात्र केवळ कागदपत्र पडताळणी करून ठोस माहिती न देता लाभार्थ्यांना परत पाठविले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असून प्रशासनाच्या उदासीनतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, तालुकास्तरावर तात्काळ नियोजन करून साहित्य वाटपाचे वेळापत्रक जाहीर करावे व कामगारांना लवकर लाभ द्यावा, अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे. तिवसा येथील बांधकाम कामगार कार्यालयाचा कारभार सध्या प्रश्नचिन्हाखाली आला आहे.
लाभार्थ्यांना कोणतीही स्पष्ट व समाधानकारक माहिती दिली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कार्यालयात गेलेल्या कामगारांना वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप आहे.construction worker kit काही कर्मचारी कामाऐवजी गप्पागोष्टीत तर काही मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे. गरीब व गरजू कामगार तासन् तास प्रतीक्षा करूनही रिकाम्या हाताने परत जात आहेत. अडचणी सोडविण्याऐवजी थेट जिल्हा कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला जात असल्याची नाराजी आहे. तालुक्यात स्वतंत्र कार्यालय असूनही उपयोग होत नसल्याची भावना तीव्र झाली आहे. यामुळे कामगारांमध्ये संभ्रम व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे