अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात तातडीची कारवाई

19 Feb 2026 11:35:41
तभा वृत्तसेवा
 
 
दारव्हा,
Darwha Police Station action,दारव्हा पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरण व अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 48 तासांच्या आत आरोपीला जेरबंद करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या धाडसी आणि तत्पर कारवाईमुळे परिसरात पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे.अल्पवयीन पीडिता ही तिच्या मोठ्या आईसोबत महाशिवरात्रीनिमित्त मल्लिकार्जुन मंदिर येथे दर्शनासाठी आली होती. संध्याकाळी उशीर होऊनही ती घरी परत न आल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. मात्र ती कुठेही न सापडल्याने त्यांनी मंगळवार, 16 फेब्रुवारी रोजी दारव्हा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
 

Darwha minor girl kidnapping case, Darwha Police Station action, 
तक्रार येताच पोलिसांनी वेळ न दवडता तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त माहिती व पोलिसांच्या विशेष यंत्रणेच्या साहाय्याने आरोपीचा माग काढण्यात आला. तपासादरम्यान पीडिता व आरोपी हे मध्यप्रदेश राज्यातील खंडवा येथे असल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ पथक रवाना करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले व पीडितेची सुखरूप सुटका करण्यात आली.या प्रकरणातील आरोपी लोकेश विनोद राठोड (वय 24, खोपडी मिरासे, ता. दारव्हा) याच्याविरुद्ध अपहरण व अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास ठाणेदार शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक शिवशंकर कायंदे करीत आहेत.
विशेष म्हणजे, 16 फेब्रुवारी Darwha Police Station action रोजी तक्रार दाखल झाल्यानंतर 18 फेब्रुवारीपर्यंत, म्हणजेच कमी-जास्त 48 तासांच्या आत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले. या जलद आणि अचूक कारवाईमुळे दारव्हा पोलिसांच्या दक्षतेचे आणि कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.संकटसमयी दाखवलेली तत्परता, तांत्रिक तपास कौशल्य आणि गुप्त माहितीचे अचूक जाळे यांच्या जोरावर दारव्हा पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यतत्परतेची छाप उमटवली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस दल कटिबद्ध असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले.
Powered By Sangraha 9.0