केंद्रीय मंत्री गडकरींची बदनामी करणाऱ्या तीन इंस्टाग्राम हँडलरवर गुन्हे दाखल

19 Feb 2026 21:51:43
अनिल कांबळे
नागपूर,
union minister gadkari केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर इंस्टाग्रामवर पोस्ट करुन बदनामी करणाऱ्या तीन इंस्टाग्राम हँडलरवर सायबर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. त्या तिघांचाही तांत्रिकपद्धतीने शाेध घेऊन ताब्यात घेण्यात येणार आहे. सायबर पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत अनेकांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ, फोटाे, मॅसेज आणि मजकूर टाकला आहे.
 

गडकरी  
 
त्यामध्ये अनेकांनी गडकरींच्या कार्याबाबत सकारात्मक संदेश दिले आहेत. मात्र, काही इंस्टाग्राम हँडलर यांनी आपल्या अकाऊंटवर नितीन गडकरी यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर, फोटाे आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामुळे गडकरी यांची बदनामी हाेत आहे.union minister gadkari गेल्या काही दिवसांपासून अशा बदनामीकारक पाेस्ट सातत्याने टाकल्या जात हाेत्या. या प्रकाराची सायबर पाेलिसांनी दखल घेतली. त्यामुळे इंस्टाग्रामवर गडकरी यांची बदनामी करणाऱ्या पाेस्टचा शाेध घेतल्या जात हाेता. त्यात नागपुरातील तीन इंस्टाग्राम हँडलर यांनी गडकरी यांच्याबाबत बदनामीकारक पाेस्ट केला हाेता. त्यांच्याविरुद्ध सायबर पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती सायबर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक याेगेश घारे यांनी दिली.
.......
Powered By Sangraha 9.0