संचमान्यता २३ ऑक्टोबरच्या पटानुसारच शिक्षण संचालकांचे संघटनेला आश्वासन

19 Feb 2026 21:26:16
अमरावती, 
organization general approval पुणे येथील शिक्षण संचालक (प्राथमिक) कार्यालयात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य नेते उदय शिंदे आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांच्या नेतृत्वात शिक्षण संचालक शरद गोसावी यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात व कोल्हापूर जिल्ह्यातील संचमान्यतेतील त्रुटीमुळे ६८ शाळा प्रभावित झाल्या होत्या. बैठकीत या शाळांबाबत सविस्तर चर्चा झाल्यामुळे झालेली चुकीची संचमान्यता दुरुस्त होऊन ती २३ ऑक्टोबर, २०२५ च्या पटसंख्येनुसारच निश्चित केली जाईल व दोन दिवसात अंतिम आदेश जिल्ह्याला येतील, असे आश्वासन शरद गोसावी यांनी दिले. या निर्णयामुळे राज्यातील सर्व शाळांना फायदा झाला असून अनेक अतिरिक्त होणारे शिक्षक आता अतिरिक्त होणार नाहीत. यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे मोलाचे योगदान राहिले.
 
 
शिक्षण संचालकां
 
 
यानंतर संघटनेच्या नेत्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे येथे भेट दिली. शिक्षक समितीने इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इंग्रजीच्या पेपरमध्ये प्रश्नांसमोर मराठीत सूचना असाव्यात, अशा आशयाचे निवेदन आयुक्तांना देऊन चर्चा केली. इयत्ता चौथीच्या मुलांचा वयोगट, त्याचा ग्रामीण भाग लक्षात घेऊन प्रश्नाचा नेमका अर्थ लक्षात येण्यासाठी मराठीत सूचना दिली तर मुलांना प्रश्न समजणे सोपे होऊन गुण वाढण्यास मदत होणार आहे.organization general approval यावेळी परीक्षा आयुक्त महेश चोथे आणि परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. शिक्षक समितीच्या या प्रयत्नांमुळे मोठे यश मिळाले असून शिक्षक वर्तुळात समाधान व्यक्त होत आहे. यावेळी राज्य नेते उदय शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर, पुणे विभागाचे प्रसिद्धीप्रमुख हरिदास वर्णे, शिरोळचे तालुकाध्यक्ष विनायक मगदूम, प्रशांत देवरुखकर, तन्मय विनायक मगदूम उपस्थित होते, असे राज्य प्रसिद्धीप्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.
Powered By Sangraha 9.0