हावरापेठमध्ये शिवजयंती उत्साहात

19 Feb 2026 15:23:38
नागपूर,
Hawrapeth Shiv Jayanti गणपती हनुमान देवस्थान पंच कमेटी व हावरापेठ मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिरातील सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९६ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व शिवप्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. माजी नगरसेवक शरद बांते, श्रीधर लांडे, श्याम चौधरी, ॲड. रमेश गवळी व मदन काटे यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. मयूर हिंगणे, राम गायकवाड व सहकाऱ्यांनी समूहगान व शिवगर्जना सादर करून मानवंदना दिली.
 
 
havra
 
 
प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मनोज गावंडे, नगरसेविका शिला तराळे, मधुकर तळवेकर, राजू इटनकर, विलास जाचक व विजय गायकवाड उपस्थित होते. संगीत भजन गायिका नलिनी काटे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा सखोल अभ्यास करण्याची गरज व्यक्त करत शिवगीत सादर केले.Hawrapeth Shiv Jayanti विद्यार्थी राम गायकवाड यांनी ‘शिवचरित्र’ विषयावर प्रभावी भाष्य केले. नितीन बांगडे, शैलेश मानकर, रुपेश मोरे, मधुरा नेवारे, रेखा देशमुख व उर्वशी डोंगरे यांनीही शिवाजी महाराजांवर मनोगत व्यक्त केले. उपस्थित नागरिकांनी शिवप्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शिवभक्त शिवांश इटनकर या बालकाचा वाढदिवसही मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मेहर यांनी केले तर आभार प्रदर्शन नारायण गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनीता गायकवाड, दिनेश बांगडे, राकेश गायकवाड व विजय गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य :रमेश मेहर,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0