भोलेनगरमध्ये द्विदिवसीय हिंदू संमेलन

19 Feb 2026 13:25:20
नागपूर,
Hindu Conference - “हिन्दव: सोदरा: सर्वे, न हिन्दू पतितो भवेत्। मम दीक्षा हिन्दू: रक्षा, मम मंत्र: समानता।।’’ हा मंत्र घेऊन देशभरात आयोजित करण्यात येत असलेल्या विराट हिंदू संमेलनांतर्गत भोलेनगर वस्ती, उदय नगर रिंग रोड, नागपूर येथे १४ व १५ फेब्रुवारीला द्विदिवसीय विशाल हिंदू संमेलन उत्साहात पार पडले.शनिवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पूजनीय संत श्री भगीरथ महाराज (सरपी आश्रम, बेलतरोडी) यांच्या उपस्थितीत भव्य धर्मध्वज यात्रेचे आयोजन करण्यात आले. श्री राम नगर हनुमान मंदिर येथून यात्रेला प्रारंभ झाला.नगरपरिक्रमा करून यात्रा संमेलन स्थळी पोहोचली.संत श्री भगीरथ महाराज यांच्या उद्बोधनानंतर भारतमातेची आरती होऊन पहिल्या दिवसाचा समारोप झाला.
 
 
 
bin
 
 
 
रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता निलेश विरखरे यांच्या संकल्पनेतून व विशेष योगदानातून तसेच अमोल पोकळे यांच्या सहकार्याने द्वारिका पीठाच्या पंडितांच्या हस्ते १२ ज्योतिर्लिंग अभिषेक (जोडप्यांसाठी) व महासरस्वती अनुष्ठान (लहान मुलांसाठी) आयोजित करण्यात आले.Hindu Conference  दुपारी २ वाजेपर्यंत अभिषेक, यज्ञ, होम व हवन विधी पार पडले. मंत्रोच्चारांच्या निनादाने वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले. सुमारे ५०० नागरिक व लहान मुले या धार्मिक विधींमध्ये सहभागी झाली. आरतीनंतर मंत्रसिद्ध रुद्राक्ष व प्रसाद वितरण करण्यात आले.
दुपारी ३ ते ५ दरम्यान लाठी-काठी प्रात्यक्षिके व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. सायंकाळी ५.३० वाजता समारोपीय कार्यक्रमास प्रारंभ झाला. या कार्यक्रमाला सुमारे १००० ते ११०० नागरिक उपस्थित होते. मंडप परिसरात विविध महापुरुषांचे लावलेले छायाचित्र प्रदर्शन आकर्षणाचे केंद्र ठरले. Hindu Conference हेल्मेट वापर व रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करणारी माहितीपूर्ण गाडीही परिसरात ठेवण्यात आली होती.प्रमुख वक्ते म्हणून रामजी हरकरे (हनुमान नगर), पूजनीय संत श्री प्रदीपजी महाराज तसेच आयोजन समितीचे अध्यक्ष श्री रमेशजी गिरी उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन अमोल महाजन यांनी केले, तर प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय सुमित कठाळे यांनी करून दिला. तुलसी व भगवद्गीता भेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.सामाजिक समरसता, पर्यावरण संवर्धन, नागरी कर्तव्य, कुटुंब प्रबोधन आणि स्वआधारित जीवनपद्धती या पंचपरिवर्तन बिंदू समाजाने आत्मसात केल्यास भारत जगाला मार्गदर्शन करेल, असा विश्वास वक्त्यांनी व्यक्त केला.
सौजन्य:अमोल बोन्द्रे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0