मोबाईल बघू न दिल्याने अल्पवयीनाने सोडले घर

19 Feb 2026 19:47:30
वर्धा,
hinganghat news मोबाईल पाहू नको, असे आईने सांगितल्याने १२ वर्षाच्या मुलाने चक घर सोडल्याची घटना तक्रारीनंतर उघडकीस आली. चार दिवसांपासून मुलगा घरी न परतल्याने आईने हिंगणघाट पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.
 
 

hinganghat news 
 
प्राप्त माहितीनुसार, बालाघाट जिल्ह्यातील मलाजखंड येथील रहिवासी ललिता रमेश धुर्वे (३०) यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी रस्ता अपघातात निधन झाले. त्यानंतर कामाच्या शोधात त्या आपल्या १२ वर्षाचा मुलगा गोविंद आणि तीन वर्षांच्या मुलीसह तीन महिन्यांपूर्वी हिंगणघाट जवळील नांदगाव परिसरातील जे. आर. टेसटाईल कंपनीत कामासाठी आल्या. कंपनीच्या वसाहतीत त्या मुलगा आणि मुलीसोबत राहतात. मुलगा गोविंदला सतत मोबाईल पाहण्याची सवय होती. त्यामुळे आई त्याला वारंवार समज देत होती. मोबाईल बघू न दिल्याने यापूर्वीही तो दोन वेळा घराबाहेर गेला होता.hinganghat news पण संध्याकाळी तो परतला होता. १४ फेब्रुवारीला दुपारी गोविंद मोबाईल पाहत असताना ललिताने त्यास सतत मोबाईल बघू नको, असे म्हणत रागावले. त्यानंतर रागाच्या भरात गोविंद घराबाहेर निघून गेला. बराचवेळ होऊनही तो घरी परत न आल्याने त्याचा शोध सुरू केला. शोध घेऊनही गोविंद न मिळाल्याने अखेर हिंगणघाट पोलिसात तक्रार दिली.
Powered By Sangraha 9.0