पाकच्या विजयावर इरफानचा कटाक्ष...म्हणे लहान संघासमोर...

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Irfan's statement on Pakistan's victory आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये पाकिस्तानने नामिबियाविरुद्ध मिळवलेल्या विजयामुळे सुपर ८ मध्ये स्थान निश्चित केले. सामना १०२ धावांनी जिंकत संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर आपली ताकद दाखवली. मात्र या विजयावर माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाणने टीका केली आणि पाकिस्तानच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले. इरफानने सांगितले की, पाकिस्तान लहान संघांविरुद्ध उत्कृष्ट खेळतो, परंतु मोठ्या आणि बलाढ्य संघांविरुद्ध त्याचं प्रदर्शन तितकं मजबूत दिसत नाही. त्यांनी असेही म्हटले की, लहान संघांवर विजय मिळवणे सोपे असते, पण खऱ्या सामर्थ्याची कसोटी ही बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध होते.
 

irfan 
पाकिस्तान सुपर ८ मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका सारख्या संघांचा सामना करणार आहे. या सामन्यांमध्ये संघाला दबाव सहन करून सामने जिंकता येईल की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सुपर ८ फेरीत पाकिस्तानचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध होईल. या विधानामुळे सोशल मीडियावर चर्चा तळत आहे, कारण अनेक चाहते पाकिस्तानच्या विजयावरुन विचार करीत आहेत की त्याची खरी कसोटी आता सुरू झाली आहे.