जगदिशनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

19 Feb 2026 17:18:31
नागपूर,
Jagdishnagar Nagpur जगदिशनगर चौक येथे जनहित युवा फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ज्येष्ठ समाजसेवक राजकुमार तलवारे यांनी शिवरायांचा गौरवशाली इतिहास जिवंत ठेवणे व तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केले. त्यांच्या विचारांतून संस्कारी व चारित्र्यवान पिढी घडविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

sdt 
 
 
कार्यक्रमात सहकार्याध्यक्ष सचिन शेंडे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.Jagdishnagar Nagpur अध्यक्ष शिवशंकर ताकतोडे, मराठा सेवा संघाचे नेते अभय वैद्य, विजय पोहरकर, रेशमा अडागळे, संध्या रहांगडाळे, स्वाती सोनवाणे, मनिषा बिजेवार, पायल खोब्रागडे, निशा गजभिये, नागेश बडोले, प्रशांत जगताप, सुरेश लोणारे, प्रतिक ढोक, निखिल डूंभरे, जयंत मुलमुले, पितांबर गेंदले आदी उपस्थित होते.
सौजन्य : शिवशंकर ताकतोडे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0