नागपूर मेट्रोचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात
नागपूर,
shravan hardikar नागपूर मेट्रोने गत १२ आपल्या प्रवासात अनेक महत्वाचे टप्पे गाठले आहेत. पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतरी आता दुसर्या टप्प्याचे काम वेगाने पूर्ण केल्या जात आहे. यानंतर तिसरा टप्पा देखील सुरु केल्या जाणार आहे. दरम्यानच्या काळात मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे मेट्रो परिवाराची संख्या पुन्हा वाढणार आहे. नागपूर मेट्रोने एका मोठया परिवाराचे धारण केले आहे. हेच महा मेट्रोच्या यशाचे गमक असल्याचे स्पष्ट प्रतिपादन महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी केले.
महा मेट्रोच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त कन्व्हेन्शन हॉल, एअरपोर्ट साऊथ, येथे आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी संचालक (रोलिंग स्टॉक व सिस्टीम) विनोद कुमार अग्रवाल, संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग)अनिलकुमार कोकाटे, संचालक (प्रोजेक्ट) त्यागी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मेट्रोच्या प्रत्येक प्रवाश्याला सुरक्षितपणे प्रवासाचा आनंद देणे आपले कर्तव्य असल्याचे श्रावण हर्डीकर यांनी सांगितले, नवीन तंत्रज्ञान आले तरीही मेट्रो प्रकल्पाला पर्याय नाही. मेट्रोच्या नेटवर्क सोबतच प्रवासी संख्या वाढवणे हे देखील प्रत्येकाचे ध्येय असल्याचे हर्डीकर म्हणाले.
नागपूर मेट्रोच्या प्रगतीचा आलेख अनिलकुमार यांनी मांडला. १२ वर्षांचा कालखंड म्हणजे एक तप असून या काळात नागपूर मेट्रोने महत्वाचे टप्पे गाठले आहे. येत्या काळात नागपूर मेट्रोचा जसा विस्तार होईल त्यानुसार रोजगाराची नवीन संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. महा मेट्रोने नागपूर, पुणे आणि नवी मुंबई येथे आपला कामाचा ठसा उमटवला आहे. यानंतर ठाणे येथे मेट्रोचे काम सुरु होणार आहे.shravan hardikar एकीकडे राज्यातील मोठ्या शहरांमध्ये मेट्रोच्या पाऊलखुणा उमटत असताना, दुसरीकडे नाशिक येथे देखील येत्या काळात महा मेट्रोचे अस्तित्व जाणवेल घोषणा संचालक (प्रोजेक्ट) राजीव त्यागी यांनी केली. वर्धापन दिनाच्या निमित्ताने महा मेट्रो अंतर्गत क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस, कॅरम, बुद्धिबळ तसेच रांगोळी, कला, पेंटिंग संबंधी स्पर्धांचे आयोजन केले स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. स्थापना दिनाच्या अनुषंगाने कर्मचार्यांकरिता ध्यान साधना शिबीर घेण्यात आले.