अनैतिक संबंध... कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकले नवजात बाळ

19 Feb 2026 11:25:27
अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur newborn baby found dead नुकताच जन्मलेले स्त्री जातीचे नवजात बाळ हिलटाॅप परिसरातल्या वर्मा ले-आऊट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कार्यालयाला लागून गाेदावरी अपार्टमेंटजवळ कचèयाच्या ढिगाèयावर फेकून निष्ठूर मातेने पळ काढला. त्या बाळाचा काही तासांपूर्वीच मृत्यू झाला हाेता. एका वाटसरुला कचèयात बाळ दिसून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी अंबाझरी पाेलिसांनी त्या मातेविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 

 Nagpur newborn baby found dead 
अंबाझरी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील हिलटाॅप परिसरातल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कार्यालयाला लागून गाेदावरी अपार्टमेंटजवळून दुपारी बारा वाजता एक युवक पायी जात हाेता. त्याला कचèयाच्या ढिगाèयावर कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत काहीतरी दिसले. त्याने जवळ जाऊन बघितले असता ते नुकताच जन्म झालेले नवजात बाळ हाेते. काही वेळातच नागरिकांनी माेठी गर्दी केली. माहिती मिळताच अंबाझरी पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. बाळाला काही तासांपूर्वीच घटनास्थळावर काेणीतरी आणून टाकले असल्याची शक्यता आहे. पाेलिसांनी पंचनामा करत चिमुकलीचा मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी मेडिकल रुग्णालयात पाठवला. अंबाझरी पाेलिसांनी घटनेची नाेंद घेत गुन्हा दाखल केला.
अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म ?
त्या नवजात बाळाचा जन्म अनैतिक संबंधातून झाला असून बाळाच्या जन्माची लपवणूक करण्यासाठी निष्ठूर मातेने आणि तिच्या नातेवाईकाने नवजात बाळ ेकल्याची चर्चा परिसरात हाेती. बाळाजवळच बाळंतपण करण्यासाठी लागणारे वैद्यकीय साहित्यसुद्धा आढळून आले. त्यामुळे परिसरातील रुग्णालयातही पाेलिस चाैकशी करीत आहे. सीसीटीव्ही ुटेजवरुन आराेपीचा शाेध घेणे सुरु असल्याची माहिती अंबाझरीचे ठाणेदार विनाेद गाेडबाेले यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0