आता ‘ट्रॅफिक बडी’ व्हॉट्सॲप चॅटबॉट माध्यमातून कारवाई

19 Feb 2026 14:39:41
पिंपरी-चिंचवड ,
Pimpri-Chinchwad traffic, शहरातील रस्त्यांवर वाहतूक पोलिस नसले तरी आता बेशिस्त वाहनचालकांना मोकळे रान मिळणार नाही. कारण सजग नागरिक थेट व्हॉट्सॲपद्वारे त्यांच्या उल्लंघनाची तक्रार पोलिसांकडे करू शकतात. पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या ‘ट्रॅफिक बडी’ या व्हॉट्सॲप चॅटबॉट प्रणालीमुळे ही सुविधा शक्य झाली आहे.
 

Pimpri-Chinchwad traffic, 
या प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांनी सोमवारपर्यंत (दि. १६) नऊ हजार ८७२ तक्रारी नोंदवल्या आहेत. स्थान-आधारित या प्रणालीमुळे खोट्या तक्रारी टाळता येतात आणि नागरिकांना त्यांच्या तक्रारीवर पोलिसांनी घेण्यात आलेल्या कारवाईची माहिती देखील मिळते.
 
 
‘ट्रॅफिक बडी’ ही सोपी Pimpri-Chinchwad traffic, व्हॉट्सॲप-आधारित चॅटबॉट प्रणाली असून १७ जुलै २०२५ पासून कार्यान्वित आहे. नागरिक फक्त ८७८८६४९८८५ या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे ‘हाय’ किंवा ‘हॅलो’ असा मेसेज पाठवून तक्रार नोंदवू शकतात. त्यानंतर चॅटबॉट विविध पर्याय देतो, जसे की तक्रार नोंदवणे, तक्रारीची स्थिती जाणून घेणे किंवा सूचना देणे. तक्रार नोंदवताना नागरिक फोटो, व्हिडीओ किंवा लोकेशन शेअर करतात. प्रणाली तक्रारीला आयडी देते आणि कारवाईची नियमित अपडेट्स पाठवते. या सुविधेसाठी कोणताही वेगळा ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही, फक्त व्हॉट्सॲप पुरेसे आहे.सिस्टीम स्थान-आधारित असल्यामुळे फक्त वास्तव तक्रारी स्वीकारल्या जातात. घटनास्थळी नसल्यानं किंवा पुरावा नसल्यास तक्रार रद्द केली जाते. तसेच वाहतूक व्यतिरिक्तच्या तक्रारी देखील नामंजूर होतात. आतापर्यंत एक हजार ८५५ तक्रारी नामंजूर झाल्या आहेत. रस्ते खराब असणे, खड्डे किंवा इतर दुरुस्ती-संबंधित तक्रारी ट्रॅफिक बडीद्वारे नोंदवल्या जातात, पण त्या पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे पाठवल्या जातात. पोलिस महापालिकेशी समन्वय साधून या समस्यांचे निराकरण करतात आणि आवश्यक असल्यास मासिक फॉलो-अप केला जातो. यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी तक्रार नोंदवून उपाय मिळतो. आतापर्यंत रस्त्यांसंबंधी ३२० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिसांचे पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, विवेक पाटील यांनी सांगितले की, ही राज्यातील पहिली स्थान-आधारित प्रणाली असून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर सकारात्मक परिणाम करत आहे. त्यांनी नागरिकांना या सुविधेचा सक्रिय वापर करण्याचे आवाहन केले.या नव्या तंत्रज्ञानामुळे शहरातील वाहनचालकांना नियम पाळण्यास प्रवृत्त केले जाईल, तसेच नागरिकांना सुरक्षित आणि सुव्यवस्थित रस्ते अनुभवता येतील.
Powered By Sangraha 9.0