अनिल कांबळे
नागपूर,
cyber criminal सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अटक, शेअर मार्केट व्यवहारात दाम दुप्पट आणि बँकेचे बनावट अॅप्लिकेशन पाठवून लाखाे रुपयांची फसवणूक केली. सायबर पाेलिसांनी वेगाने तपास करत फसगत झालेल्या तिघांना 29 लाख रुपयांच्या रकमेचा परतावा मिळवून दिला. सायबर शाखेने वेळीच तक्रार दाखल झाल्यानंतर फसवणूक करणाèयांची बँक खाती गाेठवून ही रक्कम परत मिळवली.

शहरातील एका व्यावसायिकाला डिजीटल अटक हाेणार असल्याची भिती दाखवत सायबर ठगांनी 16 लाख 50 हजारांची फसवणूक केली हाेती. दुसèया एका घटनेत नाेकरदाराला सायबर गुन्हेगारांनी राेखे व्यवहारात रक्कम गुंतवल्यास दाम दुप्पट दराने परतावा मिळेल, असे आमिष दाखवत जाळ्यात ओढले. राेखे व्यवहाराच्या बनावट वेबसाईटवरून गुंतवणुकदाराची खासगी माहिती मिळवत ठगबाजांनी 10 लाख 95 हजारांची रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळती करून घेतली हाेती. दुसèया घटनेत युनियन बँक ऑफ इंडियात खाते असलेल्या नाेकरदाराची सायबर गुन्हेगारांनी 1 लाख 59 हजारांची फसवणूक केली हाेती. माेबाईलवर बँकेचे बनावट अॅप्लिकेशन पाठवून सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या खात्यातील रक्कम चाेरली हाेती.cyber criminal फसवणुकीला बळी पडलेल्यांकडून वेळीच तक्रारी दाखल झाल्याने सायबर शाखेने ज्या ज्या बँक खात्यांमध्ये ऑनलाईन रकमा वळती झाल्या हाेत्या, ते खाते गाेठवत बँकेशी संपर्क साधत रक्कम परत मिळवली. अखेर फसवणूक झालेली रक्कम परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.