बडनेरातील बोगस डॉक्टरवर धाड

तीनही वैद्यकीय पॅथींचा व्यवसाय

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
अमरावती,
bogus doctor in badnera बडनेरातील एका बोगस डॉक्टरच्या दवाखान्या धाड टाकून महापालिकेच्या पथकाने नुकतीच कारवाई केली. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच महाराष्ट्र मेडिकल परिषदेकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने बडनेरा शहरात असलेल्या आठवडी बाजारातील नगीना मशीदजवळ जवळपास १२ ते १५ वर्षांपासून डॉ. इंद्रजित श्रीराम सरकार हा डॉक्टर म्हणून मुळव्याध, भंगदर स्पेशालिस्ट म्हणून व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाली.
 
 

बोगस डॉक्टर 
 
 
मूळ आयुर्वेदचा व्यवसायिक म्हणून दाखविणारा हा डॉक्टर अ‍ॅलोपॅथीची सुद्धा औषधे वापरत होता. इतकेच काय, तर आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, इलेक्ट्रोपॅथिक सोबतच अ‍ॅलोपॅथिक औषधे वापरून मुळव्याधाचे पुरुष आणि महिला यांच्या शस्त्रक्रिया करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी मनपा मुख्यालयातील डॉ. रुपेश खडसे यांच्यासोबत शहरी आरोग्य केंद्र बडनेरा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. इमरान शहा यांच्या टीमने सापळा रचला. त्यांनी बनावट रुग्ण पाठवला. बोगस डॉक्टरने दोनशे रुपये फी घेतली.bogus doctor in badnera त्याची शारीरिक व इतर तपासणी केली. त्यानंतर त्याला अ‍ॅलोपॅथीचे सर्दी खोकला तापावरील औषध लिहून दिले. मूळव्याधसाठी सुद्धा त्याची तपासणी केली. मूळव्याध निघाल्यास नंतर दहा ते पंधरा हजार रुपये खर्च येईल असे सांगितले. अशा प्रकारे चमूने बोगस डॉक्टरचा भंडाफोड केला व नंतर या डॉक्टरवर कारवाई करण्यात आली.