बाबरला विश्रांती की त्याचा अपमान?

19 Feb 2026 11:05:06
इस्लामाबाद,
Rest for Babur or insult पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने नामिबियाविरुद्धच्या सामन्यात अनुभवी फलंदाज बाबर आझम यांना अंतिम अकरामध्ये स्थान न दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. स्पर्धेच्या आधीच्या सामन्यांत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या बाबरऐवजी या वेळी ख्वाजा नाफेयला संधी देण्यात आली, तर शादाब खान पाचव्या क्रमांकावर उतरला. या बदलानंतर पाकिस्तानने २० षटकांत तीन गडी गमावत १९९ धावांचा मोठा डाव उभारला असला, तरी बाबरला बाहेर ठेवण्याचा निर्णय अनेकांनी प्रश्नांकित केला.
 
 
babar azam
भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानवर गट फेरीतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला होता. बाबरचा अलीकडचा फॉर्म समाधानकारक नसल्याची चर्चा सुरू होती. तो धावा करत असला तरी त्याचा फटका मारण्याचा वेग अपेक्षेप्रमाणे नसल्याची टीका होत होती. आधी सलमान आघाला त्याच्यापेक्षा वरच्या क्रमांकावर पाठवण्यात आले आणि आता त्याला या सामन्यात संधीच देण्यात आली नाही.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना शादाब खानने स्पष्ट केले की संघात कोणालाही वैयक्तिक भावना जपण्याची मुभा नाही. व्यावसायिक खेळाडू म्हणून प्रत्येकाने संघहिताला प्राधान्य द्यावे लागते, असा संदेश त्याने दिला. परिस्थितीनुसार संघरचना बदलणे आवश्यक असते आणि त्यानुसारच निर्णय घेतले जात असल्याचे तो म्हणाला. बाबरला त्याची भूमिका स्पष्टपणे सांगितली असून कोणत्याही खेळाडूसाठी यात अपमानास्पद काही नाही, असेही शादाबने नमूद केले. संघाचा एकमेव उद्देश विजय मिळवणे हा असल्याचे त्याने ठामपणे सांगितले.
Powered By Sangraha 9.0