रितेश देशमुख सादर करणार ‘राजा शिवाजी’

शिवजयंतीच्या दिवशी पहिलं पोस्टर रिलीज

    दिनांक :19-Feb-2026
Total Views |
मुंबई
Riteish Deshmukh, शिवजयंतीच्या शुभ प्रसंगी अभिनेता रितेश देशमुख ने आपल्या चाहत्यांसाठी आणि शिवभक्तांसाठी मोठी घोषणा केली आहे. अभिनेत्याने आपल्या आगामी चित्रपट ‘राजा शिवाजी’ चे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहे. या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरवरचा रितेशचा लूक चाहत्यांना खूपच आवडला असून सोशल मीडियावर त्याचं कौतुक होत आहे.
 

Riteish Deshmukh, Raja Shivaji movie, Shivaji Maharaj film, Marathi pan-India movie, Shiv Jayanti 2026, Riteish Deshmukh Shivaji role, Raja Shivaji poster release, Ajay-Atul music, Jyoti Deshpande producer, Janelia Deshmukh, Abhishek Bachchan, Sanjay Dutt, Marathi historical movie, Indian historical films, Maharashtra Day movie release, Marathi cinema 2026 
रितेश देशमुख यांचा मागील चित्रपट ‘वेड’ प्रेक्षकांकडून भरभरून पसंतीस उतरला होता. या यशानंतर रितेश पुन्हा एकदा नव्या चित्रपटाद्वारे मोठी झेप घेण्यास सज्ज झाला आहे. राजा शिवाजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही रितेश स्वतः करत आहेत. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा, युद्धतंत्र आणि पराक्रम मोठ्या पडद्यावर साकारण्यात येणार आहे.
पोस्टर रिलीज करताना रितेश देशमुखने लिहिले, “आज तोच दिवस आहे, जेव्हा पहिल्यांदा अंधाराला एका प्रकाशाचं स्वप्न पडलं. इतिहासानं जेव्हा भविष्याकडे पाऊल उचलले. याच दिवशी आपल्या मातीला नवा स्वाभिमान मिळाला. शिवजयंतीच्या शुभ प्रसंगी जीओ स्टुडिओज, मुंबई फिल्म कंपनी सादर करीत आहोत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत ‘राजा शिवाजी’ या भव्य सिनेमाचं पहिलं पोस्टर. आपला राजा, आपला अभिमान.”
चित्रपटात रितेश देशमुख व्यतिरिक्त अभिषेक बच्चन, संजय दत्त, जेनेलिया देशमुख यांसह इतर दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर सुप्रसिद्ध संगीतकार जोड्या अजय-अतुल यांनी चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सांभाळली आहे.‘राजा शिवाजी’ हा चित्रपट केवळ मराठी भाषेत नाही तर इतर भारतीय भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच हा पॅन इंडिया प्रकल्प साकार होत असल्यामुळे प्रेक्षक आणि चाहते अत्यंत उत्साहित आहेत. बहुप्रतीक्षित हा चित्रपट महाराष्ट्र दिनी, 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.