स्वराज्याच्या सूर्याला मानाचा मुजरा, सेल्फीचीही धूम

19 Feb 2026 19:49:47
वर्धा,
shiv jayanti‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’, ‘रता-रतात भिनलं काय, जय जिजाऊ जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’... अशा गगनभेदी घोषणांनी अवघा आसमंत निनादला. वर्धेसह संपूर्ण जिल्ह्यात शिवभक्तांनी शिवजयंतीनिमित्त रयतेच्या राजाला मानाचा मुजरा केला. दरम्यान, शहरातील शिवाजी चौकात शिवभक्तांनी अलोट गर्दी करीत सेल्फीचाही मनमुराद आनंद लुटला.
 

शिवभक्त  
 
 
शहरातील शिवाजी चौकात शिवरायांच्या पुतळ्याभोवती सकाळपासूनच भगवा फेटा परिधान केलेल्या महिला, तरुणाई एकवटली होती. शती-भतीचा अभूतपूर्व सोहळा अनेकांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. शहरात शिवजयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रपरिवाराने पुतळा परिसरात साकारलेले शिवदरबाराची प्रतिकृती आकर्षणाचे केंद्र ठरली. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, क्षत्रिय मराठा परिषद, अ. भा. मराठा सेवा संघासह विविध संघटनांतर्फे महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला.
 
शहरातील विविध भागांतून तरुणांनी उत्स्फूर्तपणे दुचाकी रॅली काढली. प्रत्येक दुचाकीवर भगवा ध्वज लावलेला होता. दुचाकी रॅलीत तरुणीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. अनेक तरुणी नऊवारी साडी व डोयावर भगवा फेटा बांधून दुचाकी चालवत होत्या. सर्वत्र जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष घुमत होता. शहरासह ग्रामीण भागात शिवजयंतीनिमित्त रतदान शिबिर, चित्रकला स्पर्धेसह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर शिवाजी महाराजांची शौर्यगीते वाजविली जात होती. मुख्य मिरवणूक सायंकाळी निघाली; पण अनेक उत्साही तरुणांनी सकाळपासूनच वाहनांवर शिवाजी महाराजांची प्रतिमा, पुतळा ठेवून आपापल्या भागातून मिरवणुका काढल्या.
 
सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू शिवाजी चौक होता. येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जात होते. याचवेळी अनेकांनी सेल्फीचा आनंदही घेतला. तरुणच नव्हे, तर शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन बाईक रॅली काढली. संपूर्ण शहरात चैतन्य संचारले होते. तरुणाईने विविध गीतांचे सादरीकरण करून छत्रपतींना अभिवादन केले. माझ्या राजा रं, माझा शिवबा रं या गीताने वातावरण शिवमय झालेले पहायला मिळाले.shiv jayanti तत्पूर्वी शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. युवा सोशल फोरमच्या वतीने शिवजयंती महोत्सवाअंतर्गत सायंकाळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांच्या पुढाकारात युवा चौकातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतील दांडपट्टा, लाठीकाठी, तलवारबाजी आदी शिवकालीन कला डोळ्यांचे पारणे फेडणार्‍या ठरल्या. आधार संघटनेच्या वतीने पिपरी (मेघे) येथून, तर अंबिका सोशल फाउंडेशनच्या वतीने बोरगाव येथून मिरवणूक काढण्यात आली.
  
महोत्सवाला सामाजिक उपक्रमांची जोड
शहरात गुरुवारी शिवजयंती महोत्सव उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रपरिवार, शिक्षक मित्रपरिवार, निसर्ग सेवा समितीच्या वतीने रतदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तरुणाईने उत्स्फूर्पणे रतदान करीत शिवछत्रपतींना अभिवादन केले.
Powered By Sangraha 9.0