मराठी आणि महाराष्ट्राशी बेईमानी केली!

19 Feb 2026 12:17:04
मुंबई,
Sanjay Raut's reaction महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात राजकीय चर्चांना वेग आला. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले. संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे प्रवृत्तीशी आमचे टोकाचे भांडण आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी मराठी माणूस आणि महाराष्ट्राशी बेईमानी केली. जे नंदनवन तुम्ही सांगता, ते शिवसेनेतून चोरीतून झालेले आहे. या भांडणात आमचा जय होईल. राज ठाकरे यांच्या भेटीबाबत मला काही वाटत नाही. कोण कोणाला भेटतं त्यावर आमचं बंधन नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत.
 
 

sanjay raut 
शरद पवार यांच्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले, "शरद पवार महाविकास आघाडीत आहेत, त्यांच्या पक्षाकडून अजून कोणी जाहीर केलेले नाही की आम्ही महाविकास आघाडीत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र बसून निर्णय घेऊ. शरद पवार यांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली की मी राज्यसभेत इच्छुक आहे. ते भाजप सोबत जाणार नाहीत, हे मी खात्रीने सांगतो. काँग्रेसने भीती बाळगू नये. उद्धव ठाकरे विधिमंडळात असणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. काही दिवसांत निर्णय घेतल्यावर राज्यसभेच्या जागेबाबत चर्चा होईल. संपूर्ण पत्रकार परिषदेत राऊतांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या कृतीवर जोरदार टीका करताना, राज ठाकरे यांच्या भूमिकेवर मौन राखले, मात्र स्पष्ट केले की शिवसेनेचा दृष्टिकोन आणि भांडणातील टोक आमच्या बाजूने आहे.
Powered By Sangraha 9.0