नागपूर,
Swaradhara familyस्वरधारा परिवार प्रस्तुत “द गोल्डन मेलॉडिज” हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता उत्कर्ष हॉल, हिंदी मोर भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची संकल्पना संयोजक व गायक चंद्रशेखर तासगांवकर यांची असून संजय कुळकर्णी व अशोककुमार गांधी हे तांत्रिक व प्रस्तुती सहयोगी आहेत. श्रीकांत पैठणकर, शेखर जोगवार, श्रद्धा डाऊ, रोहिणी पाटणकर, मानसी बढे व वंदना कडू हे गायक कलाकार गीते सादर करणार आहेत.Swaradhara family निवेदन अशोक गांधी यांचे असून तांत्रिक बाजू संजय कुलकर्णी सांभाळणार आहेत.प्रवेश नि:शुल्क असलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य : देवराव प्रधान,संपर्क मित्र