समुद्रपूर,
accident नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील शेडगाव चौरसत्याजवळील वाघाडी नदीच्या पुलावर ट्रकने कारला जबर धडक देऊन चिरडले. मात्र, नशीब बलवत्तर म्हणून कारमध्ये असलेले दोघेही सुखरूप बचावले.इतक्या मोठ्या अपघातात त्यांना कोणतीही इजा झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार १९ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील प्रमोद शांतीलाल बोरा, पवन प्रकाश संचेती हे दोघेही त्यांची एम. एच. ३१ एफ. ई. ४१४८ क‘मांकाच्या कारने वरोरा येथून नागपूरला जात होते. याच दरम्यान वाघाडी नदीच्या पुलावर एच. एच. ४० सि. एम. ५६०८ क‘मांकाच्या ट्रकने कारला मागून जबर धडक दिली. या अपघातात ट्रक व पुलाची भिंत या दोघांच्या मधोमध कार अक्षरश: चपकल्या गेली. कारमधील प्रमोद शांतीलाल बोरा, पवन प्रकाश संचेती दोघेही अपघातग‘स्त कारमध्ये फसले. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर पोलिस व जाम महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रमोद बोरा आणि पवन संचेती दोघांनाही कारबाहेर काढले. विशेष म्हणजे, इतया मोठ्या अपघातात त्यांना कोणतीही इजा झाली नसल्याने सर्वांनी आश्चर्य व्यत केले.
या अपघातात कार चकाचूर झाली.accident घटनास्थळी ठाणेदार रविंद्र रेवतकर, पोलिस उपनिरीक्षक चेतन टेंभुर्णे, जाम महामार्गचे प्रभारी पोलिस निरीक्षक दिलीप थाटे, पोलिस उपनिरीक्षक भय्याजी तोडासे यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी अपघातग‘स्त कार रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची समुद्रपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.