उमरखेड मतदारसंघात घरकुलांसाठी मोफत रेती वाटप

19 Feb 2026 11:50:31
तभा वृत्तसेवा
उमरखेड,
Kisna Wankhede उमरखेड विधानसभा मतदारसंघातील घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप उपक्रमाचा शुभारंभ बिटरगाव घाटावर करण्यात आला. आमदार किसन वानखेडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाची सुरुवात झाली.केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या पुढाकारातून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
 

Umrakhad Assembly constituency free sand distribution, Kisna Wankhede 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘प्रत्येकाला हक्काचा निवारा’ या संकल्पनेला बळ देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात घरकुल बांधकामासाठी आवश्यक रेती मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.उमरखेड तालुक्यातील बिटरगाव घाटावरून लाभार्थ्यांना प्रत्यक्ष रेती उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यामुळे घरकुल बांधकामाचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आ. किसन वानखेडे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास उपविभागीय Kisna Wankhede  अधिकारी सखाराम मुळे, तहसीलदार राजू सुरडकर, बिटरगाव पोलिस ठाणेदार पांडुरंग शिंदे, मंडळ अधिकारी गजानन सुरोशे, सरपंच लता घोडगे, डॉ. तिवारी, विनोद मामीडवार, पोलिस पाटील नामदेव देवकते, भास्कर देवकते, ग्राम महसूल अधिकारी अनिल नरवाडे, ग्रामपंचायत अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे घरकुल लाभार्थ्यांना घरबांधणी प्रक्रियेत गती मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे
Powered By Sangraha 9.0