तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Vishuddha Vidyalaya Yavatmal शिक्षण महर्षी बाबाजी दाते यांनी स्थापन केलेल्या विशुद्ध विद्यालय, यवतमाळ या संस्थेच्या कार्यकारिणीची 2026 ते 2031 या कालावधीसाठी निवडणूक झाली. अविरोध निवड झालेल्या कार्यकारिणीने बुधवार, 18 फेब्रुवारी रोजी कार्यभार स्वीकारला. नूतन कार्यकारिणीत सात पदाधिकाèयांचा समावेश असून संस्थेचे अध्यक्ष म्हणून विनायक श्रीकृष्ण दाते यांची फेरनिवड करण्यात आली.
संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉ. अखिलेश वसंत पेशवे, सचिव म्हणून विजय दामोदर कासलीकर, सहसचिवपदी मीरा मंगेश केळकर, कोषाध्यक्ष म्हणून मंगेश शरद केळकर आणि सदस्य म्हणून सुषमा विनायक दाते व मनीषा दाते-साठे यांची निवड करण्यात आली. बाबाजी दाते शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सकाळी बाबाजी दाते यांच्या घरी झालेल्या या नूतन कार्यकारिणीच्या पहिल्या सभेस उपस्थित सर्व पदाधिकारी तथा सदस्यांचे विशुद्ध विद्यालय अंतर्गत विविध घटक संस्थांच्या प्रमुखांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व नव्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.