धक्कादायक: बंजी जंपिंग दरम्यान मानेचे हाड तुटून तरुणीचा मृत्यू; थरारक VIDEO व्हायरल

19 Feb 2026 13:38:05
ऋषिकेश,  
woman-dies-while-bungee-jumping उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये बंजी जम्पिंग करताना एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांना धक्का बसला आहे. मृत्यू झालेली तरुणी आपल्या मित्र-मैत्रिणींसह ऋषिकेशला पर्यटनासाठी आली होती. साहसी खेळ समजल्या जाणाऱ्या बंजी जम्पिंगदरम्यान तिच्यावर अचानक धक्का बसल्यामुळे मानेवर ताण आला आणि तिच्या मानाचे हाड मोडल्याने तिचा मृत्यू झाला.
 
woman-dies-while-bungee-jumping
 
व्हिडीओमध्ये दिसते की तरुणी सुरुवातीला उत्साही असून सर्व सुरक्षा किट परिधान केले होते. मित्र-मैत्रिणी तिला चिअर्स करत होते, परंतु काही सेकंदांतच अनर्थ घडला. woman-dies-while-bungee-jumping बंजी जम्पिंग मशिन चालवणाऱ्या ऑपरेटरने जेव्हा बटण दाबले, तर तरुणी उंच हवेत उडली, अचानक घाबरल्यामुळे जोराचा झटका बसला आणि ती हवेत गोल फिरत मरण पावली. तिचा मृत्यू पाहून मित्र-मैत्रिणींमध्ये घबराट पसरली आणि त्यांनी ऑपरेटरला तिला खाली आणण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडीओ मित्र-मैत्रिणींनी मोबाईलमध्ये कैद केला होता. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर या घटनेवर संताप व्यक्त केला असून बंजी जम्पिंगच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेकांनी या घटनेला निष्काळजीपणाचे परिणाम मानले आहेत.
सौजन्य : सोशल मीडिया 
उत्तराखंडमध्ये दरवर्षी अनेक पर्यटक साहसी खेळांचा अनुभव घेण्यासाठी येतात. ऋषिकेश हे बंजी जम्पिंग आणि रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध असून दरवर्षी हजारो पर्यटक येथे या खेळांचा आनंद घेतात. अशा साहसी खेळांदरम्यान काही जण मृत्युमुखी पडत असतात, तर काही जखमी होतात. woman-dies-while-bungee-jumping यामुळे नागरिकांनी या साहसी खेळांचा अनुभव घेताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
Powered By Sangraha 9.0