पाच मुलींनी एकत्र घेतले विष...चार ठार

02 Feb 2026 10:48:11
औरंगाबाद,
Five girls took poison together बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील सैदपूर गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच मुलींनी एकत्र विष प्राशन केल्याची माहिती मिळाली असून, यापैकी चार मुलींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने गावात तणाव आणि घबराट निर्माण केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, सध्या तपास सुरू आहे. घटना हसपुरा पोलिस स्टेशन हद्दीतील अमझर शरीफ पंचायतीच्या सैदपूर गावात घडली. प्राथमिक माहिती नुसार, पाच अल्पवयीन मुलींनी विष प्राशन केले. मृत्यूनंतर कुटुंबीयांनी चारही मुलींचे अंत्यसंस्कार केले, मात्र गावकऱ्यांनी या घटनेबाबत बोलण्यास टाळाटाळ केली. पोलिसांना या घटनेची माहिती तात्काळ मिळाली नाही, आणि तेथे पोहोचताच गावकऱ्यांकडून कोणतीही मदत मिळाली नाही.
 
 

Five girls took poison  
माध्यमांनी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर पोलिस प्रशासन तातडीने कारवाईस आले. रविवारी दुपारी २ वाजता दौडनगरचे एसडीपीओ अशोक कुमार दास घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. पोलिसांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू केला आहे, पण घटनास्थळी कोणताही पुरावा किंवा साक्षीदार आढळला नाही. घटनेच्या चौकशीसाठी मगध रेंजचे आयजी क्षत्रनिल सिंह आणि पोलिस महानिरीक्षक (एसपी) राहुल यांनीही गावात येऊन तपास सुरु केला आहे. सध्या पोलीस प्रशासन या प्रकरणाची सर्व बाजूने पडताळणी करत आहे आणि कारणे शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
Powered By Sangraha 9.0