मुंबई,
Raj Thackeray मुंबई महानगरपालिकेत महापौर पदासाठी भाजपने मोठी खेळी सुरू केली असून, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सामील केल्यानंतर महायुतीचे संख्याबळ १२१ वर पोहोचले आहे. मात्र, या संख्याबळाला अजून बळकटी देण्यासाठी मनसेच्या सहा नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्याबाबत चर्चाही सुरू असल्याचे समोर आले होते.
भाजपने नुकताच गणेश कणक यांची गटनेतेपदी नियुक्ती केली असून, महापौर पदासाठी योग्य उमेदवार निवडण्यास ही मोठी कसोटी ठरणार आहे. जरी महायुतीकडे बहुमत असले, तरी आपले पारडे अधिक जड करण्यासाठी मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. याआधी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता, त्यामुळे मुंबईतही तशीच पुनरावृत्ती होईल का, अशी चर्चा रंगली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र आज (दि. २) माध्यमांशी बोलताना भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले, "भाजपला पाठिंबा देणार असं मी बोललोय का? असा कोणताही विषय झाला नाही. भारतीय जनता पक्षासोबत जाण्यासंदर्भात कुठल्याही पद्धतीची चर्चा झाली नाही," असे म्हणत भाजपला पाठिंबा देण्याच्या अफवांना खोडून काढले.
मुंबई महापालिकेत Raj Thackeray यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) गटनेता होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत मनसे आपला सहभाग नोंदवू शकेल. विशेष म्हणजे महापौरांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या गटनेत्यांच्या बैठकीत मनसे आपले मत मांडू शकेल.2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. मात्र गट स्थापन होण्याआधी शिवसेना (उद्धव पक्ष) ने सहा नगरसेवक स्वत:कडे ओढले, ज्यामुळे मनसे स्वतंत्र गट स्थापन करू शकले नाही आणि महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाही. या वेळी शिवसेना (उबाठा) यांच्या पाठिंब्यामुळे मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले असून, आता मनसेला गटनेतेपद मिळणार आहे.यामुळे मुंबई महापालिकेतील सत्तावाटपाचे समीकरण अधिक स्पष्ट झाले असून, महापौर पदासाठी भाजपची रणनीती आणि मनसेचा सहभाग आगामी निर्णयांवर महत्वाचा परिणाम करणार आहे.