विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना: मुंबई विद्यापीठाच्या फेब्रुवारी परीक्षा आता पुढे

    दिनांक :02-Feb-2026
Total Views |
मुंबई,
mumbai university  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाने ९ आणि १० फेब्रुवारीसाठी ठरवलेल्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. नवीन वेळापत्रकानुसार या परीक्षा अनुक्रमे २४ आणि २५ फेब्रुवारीला घेण्यात येणार आहेत.
 


mumbai university february-exams-rescheduled-2026 
सुरुवातीला ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ फेब्रुवारीला मतमोजणी आयोजित होती. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर विद्यापीठाने या परीक्षांचे आयोजन पुढील तारखांवर करण्याचा निर्णय घेतला.मुंबई विद्यापीठाने याआधी महापालिका निवडणुकांमुळे १४ ते १६ जानेवारी दरम्यान ठरवलेल्या परीक्षा देखील पुढे ढकलल्या होत्या. या परीक्षा नवीन वेळापत्रकानुसार ५ ते ७ फेब्रुवारीदरम्यान घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने मागील महिन्यात निवडणुकीची आचारसंहिता जाहीर केल्यावर विद्यापीठाने ४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या. या परीक्षांचे अंतिम आयोजन आता १७, १८ आणि २० फेब्रुवारीला करण्यात आले आहे.
विद्यापीठाने बुधवारी, २८ जानेवारीला दुपारच्या सत्रातील परीक्षा देखील पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. या परीक्षा नवीन वेळापत्रकानुसार २३ फेब्रुवारीला दुपारी २:३० ते ४:३० दरम्यान घेण्यात येतील.विद्यापीठाचे अधिकृत सूत्रांनी सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांनी नवीन वेळापत्रकानुसार तयारी करावी आणि परीक्षेच्या तारखांबाबत तत्काळ माहिती घेणे आवश्यक आहे.