मुंबई
unseasonal rain alert राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे चढउतार पाहायला मिळत असून कधी थंडी, कधी उकाडा तर कधी पावसाची परिस्थिती निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांसाठी थेट अवकाळी पावसाचा इशारा जारी केला आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यासाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
फेब्रुवारी महिन्याची unseasonal rain alert सुरुवात झाली असली तरी या महिन्यात फारशी थंडी जाणवणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केला होता. मात्र सध्या वाढलेला उकाडा आणि वातावरणातील बदल पाहता पावसाला पोषक परिस्थिती तयार झाली आहे. काल राज्यातील अनेक भागांत धूसर वातावरण दिसून आले, तर वायू प्रदूषणातही वाढ झाल्याचे निदर्शनास आले. या सतत बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून सर्दी, खोकला आणि श्वसनासंबंधित तक्रारी वाढत आहेत. काही नागरिकांना श्वास घेण्यासही अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या unseasonal rain alert अंदाजानुसार नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, नंदूरबार, अहिल्यानगर आणि ठाणे परिसरातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळच्या किनारपट्टीलगत सुमारे ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुढील एक ते दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता कायम आहे.या अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच आता पुन्हा पावसाचा इशारा मिळाल्याने उभ्या पिकांवर संकट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डिसेंबर महिन्यात थंडी स्थिर होती, मात्र जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात सतत बदल होत असल्याचे दिसून आले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या मुसळधार पावसानंतर हवामानातील अस्थिरता अधिकच वाढली आहे.हवामानातील या बदलत्या परिस्थितीमुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.