आज पासून दहावी बोर्ड परीक्षा, तब्बल १६ लाखांहून अधिक विध्यार्थी देणार परीक्षा

20 Feb 2026 10:54:52
मुंबई, 
10th board exams राज्यातील दहावीची बोर्ड परीक्षा आजपासून सुरू होत असून तब्बल १६ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education तर्फे घेण्यात येणारी ही परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान पार पडणार आहे.
 

१ ० थ बोर्ड  
 
 
यंदा राज्यभरातून १६,१५,४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ३,८७९ ने अधिक आहे. बारावी परीक्षेदरम्यान उघडकीस आलेल्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर यंदाची दहावी परीक्षा सुरळीत पार पाडण्याचे मोठे आव्हान राज्य मंडळासमोर आहे.
नऊ विभागीय मंडळांत परीक्षा
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. सकाळच्या सत्रातील परीक्षा १०.३० वाजता तर दुपारचे सत्र २.३० वाजता सुरू होईल. विद्यार्थ्यांनी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
५,१११ परीक्षा केंद्रे, २७१ भरारी पथके
यंदा राज्यभरात ५,१११ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे.10th board exams गैरप्रकार रोखण्यासाठी २७१ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील वर्षी ५,१३० केंद्रे होती; मात्र गैरप्रकार आढळलेल्या ३१ केंद्रांवर कारवाई करत ती रद्द करण्यात आली आहेत.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
शासनाच्या निर्देशानुसार परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच केंद्र परिसरात आवश्यक ती प्रतिबंधात्मक पावले उचलण्यात आली आहेत.
दहावीच्या या महत्त्वाच्या परीक्षेकडे राज्यभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे लक्ष लागले असून परीक्षा शांततेत व पारदर्शक पद्धतीने पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0