वर्धा,
216 students apply for the paper महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणार्या दहावीच्या परीक्षेला आज शुक्रवार २० रोजी सुरूवात झाली. जिल्ह्यातील ७३ केंद्रांवरूनही परीक्षा घेतली जात असली तरी शुक्रवारी मराठीच्या पेपरला २१६ विद्यार्थ्यांची अनुपस्थिती होती. १२ हजार ६६१ विद्यार्थ्यांनी भयमुत वातावरण आणि शांततेत पेपर सोडविला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्या बारावीच्या परीक्षेला १० फेब्रुवारीपासून तर आज शुक्रवार २० फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली.

या दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्या याकरिता शिक्षण विभागाच्या वतीने विशेष खबरदारी घेतली जात आहे. कॉपीबहाद्दरांवर धडक कारवाई करण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने ६ भरारी पथकही तयार करण्यात आले आहे. पथकांमधील अधिकार्यांनी शुक्रवारी दहावीची परीक्षा सुरू असताना विविध परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देत परीक्षा व्यवस्थेची पाहणी केली. दहावीच्या परीक्षेसाठी १५ हजार ६३० विद्यार्थी प्रवेशीत आहेत. परीक्षेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याहेतूने दहावीच्या जिल्ह्यातील ७३ परीक्षा केंद्रांवर पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आला होता.