आ.किशोर जोरगेवार यांची प्रकृती स्थिर

20 Feb 2026 19:45:45
हृदयविकाराचा त्रास झाल्याने शस्त्रक्रिया पार पडली
 
 
 
A. Kishore Jorgewar
 
 
चंद्रपूर, 
A. Kishore Jorgewar's condition येथील भाजपा आमदार किशोर जोरगेवार यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने गुरूवार, 19 फेब्रुवारी रोजी येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. तपासणीदरम्यान त्यांच्या हृदयातील एका रक्तवाहिनीत अडथळा होत असल्याचे लक्षात येताच शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. गुरूवारी दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती मिळताच, त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून आमदार जोरगेवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. रुग्णालयातच त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. ‘अँजिओग्राफी’मध्ये हृदयातील एका रक्तवाहिनीत ‘ब्लॉकेज’ असल्याचे निष्पन्न झाले. लगेच रात्री ‘अँजिओप्लास्टी’ करण्यात आली. आता ते बरे आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी कळविले आहे.
Powered By Sangraha 9.0