सुपर-८मध्ये अभिषेक शर्मा बाहेर ? प्रशिक्षक गंभीरची आफ्रिकेविरुद्ध विजयासाठी रणनीती

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,  
abhishek-sharma सुपर-८ फेरीत प्रवेश केलेल्या टीम इंडियाचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार असून स्पर्धेतील खरी कसोटी आता सुरू होणार आहे. सलग विजयांसह पुढे आलेल्या भारतीय संघाने गट टप्पा पार केला असला, तरी एक महत्त्वाचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे, सलामीवीर अभिषेक शर्माची सातत्याने अपयशी ठरत असलेली फलंदाजी. स्पर्धेपूर्वी तुफानी फॉर्ममध्ये असलेला हा डावखुरा फलंदाज आतापर्यंत अपेक्षांवर खरा उतरू शकलेला नाही.
 
abhishek-sharma
 
टी-२० विश्वचषकात आतापर्यंत त्याला धावांचे खाते उघडताही आलेले नाही. abhishek-sharma अमेरिकेविरुद्ध गोल्डन डक, पाकिस्तानविरुद्ध चार चेंडूत शून्य, तर नेदरलँड्सविरुद्ध तीन चेंडू खेळूनही शून्यावर बाद, अशी त्याची कामगिरी राहिली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या फलंदाजाकडून अशी कामगिरी होणे संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही ते दोनदा शून्यावर बाद झाले होते. मागील आठ डावांपैकी पाच वेळा त्यांना धावसंख्या उघडता आलेली नाही, ही आकडेवारी परिस्थितीची गंभीरता दाखवते.
आता सुपर-८मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजसारख्या संघांशी सामना करायचा असल्याने व्यवस्थापनासमोर मोठा निर्णय उभा ठाकला आहे. अभिषेकला आणखी संधी द्यायची की त्याऐवजी संजू सॅमसनला अंतिम अकरामध्ये स्थान द्यायचे, यावर चर्चा सुरू आहे. यापूर्वी संजू धावांसाठी झगडत असताना ईशान किशनला सलामीला पाठवण्यात आले होते आणि त्याने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना चांगली कामगिरी केली होती.  abhishek-sharma नामिबियाविरुद्ध अभिषेक बाहेर असताना संजूने सलामीची जबाबदारी सांभाळली होती; मात्र त्यालाही विशेष यश मिळाले नव्हते.
संजूला संधी दिल्यास डावखुरा-उजव्या हाताचा सलामी जोडीचा पर्याय उपलब्ध होईल, हा एक सकारात्मक मुद्दा आहे. मात्र अभिषेकच्या क्षमतेवर कोणालाही शंका नाही. तो लयीत आला तर मोठ्या सामन्यांत षटकारांची बरसात करण्याची ताकद त्याच्यात आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन ‘रिस्क’ घ्यायचे की बदल करायचा, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुपर-८ची सुरुवात होत असताना हा निर्णय भारताच्या मोहिमेसाठी निर्णायक ठरू शकतो.