इंद्रप्रस्थ नगरात सकल हिंदू समाज संमेलन

20 Feb 2026 15:11:27
नागपूर,
Indraprastha Nagar इंद्रप्रस्थ नगरात “सकल हिंदू समाज संमेलन” पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, भारत माता पूजन, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पार्चन आणि गो पूजन करून करण्यात आली. विविध स्पर्धांमध्ये बालगोपाल गोपिकांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला आणि स्पर्धांची शोभा वाढविली. चित्रकला, रांगोळी, वेशभूषा स्पर्धा तसेच नृत्य सादरीकरण अत्यंत मनमोहक झाले. महिला कार्यकर्त्यांनी गीतेचा अध्याय सादर करून उपस्थितांना आध्यात्मिक आनंद दिला.
 
Indraprastha Nagar
 
महिला वक्त्या मेधा नांदेडकर आणि प्रमुख वक्ता दीपक देशपांडे यांनी समाजाला मार्गदर्शक संदेश दिले. प्रमुख अतिथी कर्नल चंद्रशेखर एम. देसाई (सेनातून निवृत्त) यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आपला अमूल्य वेळ दिला. कार्यक्रमाचे यश आयोजक कार्यकर्त्यांच्या परिश्रम आणि उत्तम नियोजनाचे फलित ठरले. Indraprastha Nagar संचालन अनुजा देशपांडे व अनघा दीक्षित यांनी केले, प्रास्ताविक वीणा मोहाडीकर यांनी मांडले, आणि मान्यवरांचे परिचय अनघा दीक्षित यांनी दिले. चित्रकला स्पर्धेचे नियोजन मुग्धा महाजन यांनी, रांगोळी स्पर्धा स्नेहल जगदाळे व पद्मा गायकवाड यांनी, वेशभूषा स्पर्धा महिला मंडळींनी, तर गीत सादरीकरण प्रवृत्ती कोन्हेर यांनी केले. आभार प्रदर्शन स्वाती कुरुमकर यांनी केले. चित्रकला स्पर्धेसाठी कावरे बंधूंनी जागा उपलब्ध करून दिली.
 
संपूर्ण कार्यक्रमात आल्हाद हरदास, अशोक देशपांडे, धनंजय कुरुमकर, प्रसाद कोन्हेर, संजय गोगटे, निशांत कावरे, मुकुंद महाजन, विनोद देशपांडे, प्रसाद बर्वे, नितीन किन्हेकर, विनोद गोगटे, गुलाब शाहू, रामा मुरली, सुनील भगवत, सुरेश भागवत, धनराज ठाकरे, हेमा कुलकर्णी, श्रीकांत रेखडे, राजेश दीक्षित, मिथिलेश जगदळे, मनोज दीक्षित, मिश्रा, राजुजी पेशकर, संगीता कावरे, कुमारी श्रद्धा कुरुमकर आणि अनेकांनी सक्रिय योगदान दिले. हरबडे व तारेकर यांनी आपल्या घरासमोर मांडव उभारण्यास मदत केली. गो पूजनासाठी गाय आर्यन मिश्रा यांनी उपलब्ध करून दिली, तर मंडप व डेकोरेशन राकेश बागडे यांनी दिले. Indraprastha Nagar संस्कृत भारतीतर्फे पुस्तक व वस्तू प्रदर्शन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन इंद्रप्रस्थ नगरातील नागरिकांनी केले.
सौजन्य: स्नेहल जगदळे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0