पाकिस्तानच्या जाळ्यात अडकला बांगलादेश? नक्वींनी ‘गैरमार्गदर्शन’ केल्याचा आरोप

20 Feb 2026 13:48:58
नवी दिल्ली,  
bangladesh-pakistan आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या तोंडावरच मोठा वाद निर्माण झाला होता. सुरक्षेचे कारण पुढे करत बांगलादेशने भारतात स्पर्धेसाठी येण्यास नकार दिल्यानंतर परिस्थिती चिघळली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ही विनंती मान्य न केल्यामुळे बांगलादेशला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आणि त्यांच्या जागी स्कॉटलंडला संधी देण्यात आली. या घडामोडीनंतर पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर प्रतीकात्मक बहिष्कार जाहीर करत बांगलादेशशी ऐक्य दाखवण्याचा प्रयत्न केला.
 
bangladesh-pakistan
 
या निर्णयामागे पाकिस्तानचा प्रभाव असू शकतो, असा गंभीर आरोप आता पुढे आला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे माजी सरचिटणीस सय्यद अश्रफुल हक यांनी एका मुलाखतीत सूचक विधान केले. त्यांच्या मते, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांच्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचा प्रभाव पडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. “मी राजकारणात पडू इच्छित नाही, पण क्रिकेट प्रशासक म्हणून प्रामाणिकपणा आणि बांधिलकी महत्त्वाची असते. कदाचित अमिनुल इस्लाम यांना चुकीचे सल्ले देण्यात आले असतील,” असे हक यांनी नमूद केले. भारत दौऱ्याला न जाण्याच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी बांगलादेश सरकारकडून घेतलेला निर्णय अकाली आणि अविचारी होता, असे त्यांचे मत आहे. bangladesh-pakistan विशेषतः, मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमध्ये खेळण्याबाबत निर्माण झालेल्या वादामुळे इतका कठोर पवित्रा घेणे योग्य नव्हते, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ किंवा भारत सरकारशी चर्चा करून सुरक्षा हमी मिळवण्याचा पर्याय खुला होता. आयसीसीने स्पर्धेसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था केली होती; उर्वरित शंका असल्यास अतिरिक्त आश्वासने मागता आली असती.
हक यांनी पुढे असेही म्हटले की, बीसीबी नेतृत्वाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कूटनीतीचा योग्य अंदाज न घेतल्याने संघ आणि खेळाडूंना त्याची किंमत मोजावी लागली. “खेळाडू हे देशाची सर्वात मोठी संपत्ती असतात. bangladesh-pakistan त्यांचे हित जपण्याऐवजी इतर गोष्टींना प्राधान्य देण्यात आले,” असा आरोप त्यांनी केला. लिटन दास, मुस्तफिजूर रहमान आणि नझमुल शांतोसारखे अनुभवी खेळाडू विश्वचषकात खेळू शकले नाहीत, ही चाहत्यांसाठी मोठी निराशा असल्याचे त्यांनी नमूद केले. क्रिकेटवेड्या देशातील चाहत्यांना त्यांच्या संघापासून दूर ठेवणे अन्यायकारक आणि खेदजनक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
Powered By Sangraha 9.0