बीड,
Beed corruption, राज्यातील सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचाराची गंभीर छाया पुन्हा एकदा उजेडात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला रंगेहात लाच घेताना अटक झाल्याची घटना ताजी असतानाच, मुंबईतील मुलुंड येथे एसीबीच्या कारवाईत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आले. याच पार्श्वभूमीवर, बीड जिल्ह्यातील परळी येथे एक मोठे लाचप्रकरण उघड झाले असून परळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे.
माहितीनुसार, परळीतील रहिवासी एका तक्रारीसाठी सालन्सी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तहसीलदार मुंडे यांच्याकडे गेले होते. या प्रक्रियेत तहसीलदारांनी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये तडजोडीअंती वीस हजार रुपयांवर सहमती झाली. या प्रकरणात तक्रारदाराने लगेच एसीबीची मदत घेतली आणि रंगेहात पकडण्यासाठी एसीबीने सापळा रचला.
प्रारंभिक चौकशीत असे Beed corruption, दिसून आले की, तक्रारदाराच्या हालचालींवर तहसीलदारांनी शंका व्यक्त केली आणि काही वेळा पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केली. मात्र, एसीबीने प्रकरणाची सर्व माहिती आणि आवश्यक पुरावे संकलित करून व्यंकटेश मुंडे यांना ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरु असल्याची माहिती अधिकारांनी दिली.एसीबीच्या या कारवाईमुळे महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांत वाढत्या छाप्यांमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांचे काम सुलभ करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेतही लाचप्रथा अद्यापही कायम असल्याचे ही स्पष्ट झाले आहे.राज्यातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये एसीबीच्या कारवायांनी भ्रष्टाचाराविरोधात एक सुस्पष्ट संदेश दिला आहे, तरीही सामान्य नागरिकांना प्रशासनिक व्यवहारांमध्ये पैसे देण्याची गरज भासते, हे गंभीर वास्तव आहे. याप्रकरणी पुढील तपास एसीबी सुरू ठेवणार आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई होणार आहे.
राज्यातील नागरिकांसाठी हे प्रकरण प्रशासनातील पारदर्शकतेसाठी महत्त्वाचे असून, भविष्यात अशा कारवाईत वाढ होण्याची शक्यता आहे.