मुंबई,
Suraj Chavan,बिग बॉस मराठी या लोकप्रिय रिअॅलिटी शोचा सहावा सिझन सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत असताना, पाचव्या सिझनमधील विजेता सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पाचव्या सिझनमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून घरात प्रवेश केलेल्या सूरजने विजेतेपद पटकावले होते. आता त्याच सिझनमधील स्पर्धक ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर हिने दिलेल्या मुलाखतीत सूरजच खरा मास्टरमाईंड होता, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
‘बिग बॉस’च्या घरात प्रत्येक Suraj Chavan स्पर्धक वेगवेगळ्या रणनितीने खेळत असतो. काही जण गटबाजीच्या जोरावर पुढे जातात, तर काहीजण स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करून टिकून राहतात. अंकिताच्या मते, सूरजने सुरुवातीपासूनच आपली प्रतिमा नेमकी कशी सादर करायची, याचे अचूक नियोजन केले होते. “सूरजचा भोळेपणा पाहून त्याला गेम कळत नाही, असा आम्हाला भ्रम झाला होता. पण त्याला खूप आधीपासूनच सगळं समजलं होतं. आम्ही घराबाहेर पडल्यानंतरच याची जाणीव झाली,” असे ती म्हणाली.सूरजने आपल्या गरीब परिस्थितीचा फायदा घेतल्याची टीका काही प्रेक्षकांनी केली होती. यावर भाष्य करताना अंकिता म्हणाली, “सोशल मीडियावर इमोशन्स विकले जातात. तुम्ही जितका भावनिक कंटेंट द्याल, तितका तो लोकांना आकर्षित करतो. त्यामुळे कुणीही बिचारा नसतो. सोशल मीडियावर काय विकायचं आणि कसं विकायचं, हे त्या व्यक्तीला माहीत असतं. रिअॅलिटी शोमध्ये जसं जातीवाचक विधानांना बंदी असते, तसंच परिस्थितीवाचक विधानांनाही बंदी असावी. गरीबी किंवा वैयक्तिक अडचणी यांचा वापर सहानुभूती मिळवण्यासाठी होऊ नये.”
घरातील आपल्या अनुभवांबद्दल Suraj Chavan बोलताना अंकिताने स्पष्ट केले की, तिला सुरुवातीला गेमची दिशा समजत नव्हती. “मी बिग बॉसचे आधीचे एकही एपिसोड पाहिले नव्हते. त्यामुळे घरात काय करायचं, कसं वागायचं याचा अंदाज येत नव्हता. तुम्ही कितीही चांगले वागलात तरी टीव्हीवर काय दाखवायचं, हे निर्मात्यांच्या हातात असतं. मला नेहमी ‘तू दिसत नाहीस’ असं सांगितलं जायचं. पण दिसणाऱ्यांनाही ओरडा मिळत होता. त्यामुळे नेमकं काय करायचं, याच संभ्रमात मी शेवटपर्यंत राहिले,” असे ती म्हणाली.दरम्यान, सहाव्या सिझनच्या पार्श्वभूमीवर पाचव्या सिझनमधील या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. अंकिताच्या या प्रतिक्रियेमुळे सूरजच्या खेळाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, रिअॅलिटी शोमधील रणनीती आणि प्रतिमानिर्मिती यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.