६ सरपंच व १६ सदस्य पदासाठी होणार पोटनिवडणूक

20 Feb 2026 16:49:54
कारंजा लाड,
sarpanch राजीनामा व निधन यासह विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी कारंजा तालुयातील १५ गावांत पोटनिवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. जनतेतून थेट सरपंच व सदस्य निवडीसाठी या १५ गावांमध्ये पोटनिवडणूक होणार असून, विविध कारणास्तव रिक्त झालेल्या बेलखेड, अंतरखेड, मोखड पिंपरी, धोत्रा जहागीर, काजळेश्वर आणि बेलमंडळ या ६ सरपंच व बेलखेड,धनज बुद्रुक, भुलोडा, अंतरखेड, किन्ही रोकडे, महागाव, मनभा, ढंगारखेड, धनज खुर्द, पलाना आणि टाकळी खुर्द या गावातील १६ सदस्य अशा २२ ग्रामपंचायत सदस्य पदांसाठीही मतदान घेण्यात येणार आहे. सदस्यत्व अपात्र ठरणे, स्वेच्छा राजीनामे, पदावरील व्यक्तींचे निधन तसेच नामनिर्देशन पत्र प्राप्त न होणे आदी कारणांमुळे ही पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासन सुरळीत ठेवण्यासाठी पोटनिवडणूक आवश्यक ठरली आहे.
 
 
 
sarpanch
 
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या निश्चित करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. १ जुलै २०२५ या अर्हता तारखेनुसार उपलब्ध असलेल्या मतदार याद्यांवर आधारित ही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. दुरुस्ती किंवा हरकती यासाठी निर्धारित कालावधीत प्राप्त अर्ज छाननी पूर्ण झाल्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.sarpanch त्यानंतर फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शयता आहे. या पोटनिवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, अनेक ठिकाणी इच्छुकांनी तयारीला सुरुवात केली आहे. गावपातळीवरील सत्तासमीकरणे बदलण्याची शयता असल्याने या निवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे आहेत.
Powered By Sangraha 9.0