पश्चिम नागपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा

20 Feb 2026 19:21:47
नागपूर,
West Nagpur अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पश्चिम नागपूर जिल्हा, छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त धरमपेठ नगर हनुमान मंदिर ग्राउंड, रामनगर येथे व्याख्यानात्मक कार्यक्रम आणि ढोल-ताशा पथकाचे आकर्षक आयोजन केले.
 
West Nagpur
 
कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितींमध्ये धरमपेठ नगर अध्यक्ष किशोर पाटील, धरमपेठ नगर मंत्री अन्नू मरसकोल्हे, प्रमुख वक्ता हिंगणा व त्रिमूर्ती नगर विद्यार्थी विस्तारक अनिकेत दांदडे, प्रांत सह संघटन मंत्री मनोज साबळे, प्रांत सचिवालय सचिव ऋतिक कनोजिया, प्रांत कार्यालय मंत्री महेश डोकरीमारे, धरमपेठ वाडी नगर विद्यार्थी विस्तारक भूमिका गेडाम, बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ महाविद्यालय मंत्री वेदा जोशी आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. West Nagpur कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनमूल्यांवर मार्गदर्शन देण्यात आले, तर ढोल-ताशा पथकाने उत्साहवर्धक वातावरण निर्माण केले.
सौजन्य: राऊ वाघमारे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0