शिवजन्मोत्सव व ग्रंथप्रकाशन

20 Feb 2026 18:05:05
नागपूर
Corporator Maya Hade शिवजयंती निमित्त अध्यात्म, समाजसेवा आणि जनशक्तीचा संगम अनुभवायला मिळाला. नगरसेविका माया हाडे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात ग्रंथप्रकाशन आणि मान्यवरांचा गौरव असा दुहेरी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला  कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. माया हाडे यांच्या नागपूर महानगरपालिकेतील विजयाबद्दल व सामाजिक कार्याबद्दल विविध संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. माळवी सोनार महासंघ व सोनार समाज चॅरिटेबल ट्रस्ट, तसेच संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. द्वारकाधीश प्रतिष्ठानतर्फे पद्मश्री डॉ. विलासराव डांगरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.
 

ar  
 
 
याच प्रसंगी भागवताचार्य अंजलीअनासने लिखित ‘व्यास रचित श्रीमद् भागवत कथा रहस्य’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. हा सोहळा पद्मश्री डॉ. डांगरे यांच्या हस्ते आणि पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या आशीर्वादाने पार पडला. युवा पिढीला भागवताचे ज्ञान सुलभ व्हावे, हा ग्रंथनिर्मितीचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. Corporator Maya Hade कार्यक्रमाला अजय चौधरी, रितिक चतुर्वेदी, अरविंद हाडे, अनंतराव उंबरकर, विलासराव अनासने, राजूभाऊ कळस्कर, अनिल माळोकार, धनंजय नेरकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. अनिल वाघ यांनी केले, तर सूत्रसंचालन अनिलभाऊ माळोकार यांनी केले.
सौजन्य:माया हाडे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0