VIDEO बीयर बारच्या विरोधात धोबाटोलावासी आक्रमक

20 Feb 2026 12:38:29
गोंदिया,
bear bar मागील तीन महिन्यांपासून बियर बार विरोधात सुरू असलेल्या देवरी तालुक्यातील धोबाटोला येथील ग्रामस्थांचा अखेर धीर सुटून संतप्त गावकऱ्यांनी थेट बियर बारकडे आपला मोर्चा वळवत बियर बार मध्ये तोडफोड केली. हि घटना १८ फेब्रुवारी रोजी घडल्याची माहिती असून आज, शुक्रवारी २० फेब्रुवारी रोजी सदर घटनेचा व्हिडिओ समोर आला असून याप्रकरणी चिचगड पोलिसात ३० ते ३५ गावकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
बिअर  बार
 
 
देवरी तालुक्यातील उचेपूर ग्रामपंचायत अंतर्गत धोबाटोला गावात अरमान बारच्या विरोधात गावकऱ्यांचे मागील ३ महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. यात काही ग्रामस्थांकडून उपोषणही करण्यात येत आहे. दरम्यान, १८ फेब्रुवारी रोजी उचेपूर ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामसभेत बार सुरू ठेवायचा की बंद करायचा यासाठी हात उचलून मतदान करण्यात येत होते. सायंकाळी 5 वाजतापर्यंत सुरू असलेल्या मतदानादरम्यान बारमालकाने ग्रामसभेत हस्तक्षेप केले. हस्तक्षेप होत असल्याचे पाहून ग्रामस्थांचा संघर्षाने उग्ररूप धारण केले. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी आमची सही व मतदान प्रशासनिक अधिकारी घेत नसल्याचा ठपका ठेवत गोंधळ घातला. यानंतर संतप्त गावकऱ्यांनी थेट बारकडे मोर्चा वळवत बारमध्ये घुसून फर्निचरची तोडफोड करत दारूच्या बाटल्या फोडल्या. bear bar याप्रकरणी चिचगड पोलिसांनी ३० गावकऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून १२ जणांना अटक करण्यात आली असून अटक केलल्या आरोपींमध्ये काही महिलांचाही समावेश आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून सर्वत्र स्मशान शांतता पसरलेली आहे.
 
 
View this post on Instagram

A post shared by Tarun Bharat Official (@tarunbharat_)

 

गावकऱ्यांच्या सुरुवातीपासूनच बारला विरोध होता यात २५ नोव्हेंबर पासून त्यांचे बार विरोधात आंदोलन सुरू होते. घटनेच्या दिवशी बारमालकाने ग्रामसभेत हस्तक्षेप केल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी बारची तोडफोड केली, याप्रकरणी २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून १२ जणांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींच्या शोध सुरू आहे.
- जनार्दन हेगडकर, पोलिस निरीक्षक, चिचगड
Powered By Sangraha 9.0