नागपूर,
dr upendra kothekar साहित्य संस्थांचे समाज प्रबोधन अंग असले पाहिजे, ते आहे. पण, दुर्दैवाने आज पहातो की यापासून आपण कुठेतरी बाजूला होतो आहोत, अशी खंत आज भाजपाचे विदर्भ प्रांत संघटक डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी आज येथे व्यक्त केली. अ.भा. साहित्य परिषद साहित्य भारतीच्या कथा स्पर्धेचे पुरस्कार वितरण आज उत्साहात झाले. महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री नितीन केळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला विदर्भ प्रांत अध्यक्ष चंद्रकांत लाखे, डॉ. चंद्रशेखर भुसारी, प्रकाश एदलाबादकर व्यासपीठावर उपस्थित होेते.
काही वर्षांपूर्वी साहित्य क्षेत्रात झालेल्या वादाचा उल्लेख करून कोठेकर म्हणाले की, शेवटी साहित्य निर्मिती कशासाठी, कलेची उपयोगिता काय आहे, समाज प्रबोधन हे त्याचे अंग असायला हवे. दुर्दैवाने यातून कुठेतरी बाजूला होत असल्याचे दिसते.
नितीन केळकर म्हणाले की, विविध संस्थांच्या निवडणुकीत साहित्य भारती उतरली तेव्हा संस्था बळकावण्याचा राजकीय कट, असा आरोप होत असेल तर, तुमच्या विचारांना विरोध करणारा विचार तुमच्यासमोर उभा ठाकला तर त्याचा सत्ता बळकावण्याचा डाव कसा, असा सवाल त्यांनी केला.
प्रकाश एदलाबादकर यांनी प्रास्ताविक केले. परीक्षक कृष्णा साकुळकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धा विजेते आशुतोष अडोणी, अलका मोकाशी, माधवी देशपांडे व सान्वी जनई यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. अलका मोकाशी यांनी मनोगत व्यक्त केले.
स्नेहल पाळधीकर, स्वाती मोहरील, पूनम मिश्रा, विनय माहुरकर यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
अतिरेकी राजकारण नकोच
वि.सा. संघाच्या निवडणुकीसंदर्भात त्यांच्यासंबंधी प्रसिद्ध बातम्यांचा उल्लेख करून डॉ. उपेंद्र कोठेकर म्हणाले की, शेवटी साहित्य, सामाजिक संस्था ज्या आहेत त्यांचा समाजाशी संबंध आहे की नाही. तो जर असेल, हे मान्य आहे की अशा संस्थांमध्ये राजकारणाचा अतिरेकी हस्तक्षेप नको. नसायलाच पाहिजे, हे पथ्थ्य सर्वांनीच पाळलेे पाहिजे.dr upendra kothekar पण, ज्या प्रकारचा प्रचार सुरू आहे की तो साहित्यिकच असला पाहिजे, लेखकच असला पाहिजे, ते जर नसले तर.
वि.सा. संघाच्या संस्थापकांपैकी दादासाहेेब खापर्डे, लोकनायक बापूजी अणे, टी.जी. देेशमुख ही सगळी मंडळी राजकारणात होती. पण ही मंडळी राजकारण करण्यासाठी गेली नव्हती. शेवटी केवळ साहित्यिकच नाही तर रसिक, वाचक, समीक्षक या सगळ्यांचा त्यात सहभाग असावा, ही भूमिका आहे.