जिल्ह्यातील पाच शाळांना ‘ए प्लस’ श्रेणी प्राप्त

20 Feb 2026 19:36:27
चंद्रपूर, 
Five schools in Chandrapur get A+ grade शाळा गुणवत्ता मुल्यांकन व आश्वासन आराखडा (एसक्यूएएएफ) अंतर्गत सन 2025-26 मध्ये बाह्य मुल्यांकनासाठी निवड झालेल्या राज्यातील 429 शाळांना ‘ए प्लस’ श्रेणी प्राप्त झाली आहे. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील चिंचाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बल्लारपूर तालुक्यातील सन्मित्र सैनिकी विद्यालय, वरोडा येथील हिरालाल लोया विद्यालय, जिवती तालुक्यातील टेकामांडवा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आणि सावली येथील रमाबाई आंबेडकर विद्यालय या पाच शाळांचा समावेश आहे. शासन निर्णयानुसार, राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची (एसक्यूएएएफ) निर्मिती व शाळांचे स्वयं-मूल्यांकन करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती.
 
 
chol
 
 
सन 2024-25 मध्ये राज्यातील 1 लाख 2 हजार 675 शाळांनी स्वयं मूल्यांकन पूर्ण केले. यात सर्वाधिक गुण मिळवणार्‍या शाळांपैकी सन 2025-26 मध्ये 10 हजार 712 शाळांची बाह्य मूल्यांकन करण्यासाठी निवड करण्यात आली होती. त्यापैकी 10 हजार 644 शाळांचे बाह्य मूल्यांकन पूर्ण करण्यात आले. सन 2024-25 मध्ये स्वयं मूल्यांकन केलेल्या व त्यापैकी सन 2025-26 मध्ये बाह्य मूल्यांकनासाठी निवडण्यात आलेल्या शाळांपैकी 429 शाळांना ‘ए प्लस’ श्रेणी प्राप्त झाली आहे. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील पाच शाळांचा समावेश आहे. ही श्रेणी प्राप्त झालेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0