भारताला एआय क्षेत्रात जागतिक प्रभाव निर्माण करण्याची संधी

20 Feb 2026 11:56:22
नवी दिल्ली,
Gautam Adani भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानासाठी इतर देशांच्या आयातीवर अवलंबून न राहता स्वतःच्या भक्कम पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, असे प्रतिपादन अदानी समूहाचे कार्यकारी संचालक जीत अदानी यांनी ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये केले.
 

Gautam Adani india-ai-impact-summit-jeet-adani-rishad-premji-sundar-pichai 
गौतम अदानी यांचे Gautam Adani  धाकटे चिरंजीव असलेल्या जीत अदानी यांनी भारताच्या ‘बौद्धिक शतका’च्या रोडमॅपवर प्रकाश टाकताना ऊर्जा, कम्प्युट आणि क्लाउड या तीन मुख्य स्तंभांवर भर दिला. त्यांनी सांगितले की, एआय तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरता भारताच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.याच वेळी, विप्रोचे कार्यकारी अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनी देखील एआय क्षेत्रातील भारताच्या क्षमतेवर भर दिला. “एआय तंत्रज्ञानाचा वापर व विस्तारात भारताला जगातील अत्यंत प्रभावशाली देश बनण्याची मोठी संधी आहे,” असे प्रेमजी म्हणाले. ते म्हणाले की, आगामी काळात भारत या तंत्रज्ञानाला कशा प्रकारे प्रतिसाद देतो, यावर देशाचे आर्थिक भविष्यच नाही तर १०० कोटींहून अधिक लोकांच्या समस्या सोडवण्याची क्षमता देखील अवलंबून असेल.
 
 
‘गुगल’चे सीईओ सुंदर Gautam Adani  पिचाई यांनीही या परिषदेत आपले मत व्यक्त केले. पिचाई म्हणाले, “‘एआय’ मानवी प्रगतीचा वेग कैकपटींनी वाढवणारे साधन आहे. येणारा काळ हा ‘एआय’च्या क्रांतीचा आहे. यामुळे विज्ञानातील नवे शोध लागतील आणि भारतासारख्या विकसनशील देशांना प्रगतीची मोठी झेप घेता येईल.” त्यांनी यश मिळवण्यासाठी केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे पुरेसे नाही, तर धाडसाने आणि जबाबदारीने काम करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले.या परिषदेत उद्योग, तंत्रज्ञान आणि सरकारी क्षेत्रातील नेत्यांनी एकत्र येऊन भारताच्या एआय क्षेत्रातील धोरण, पायाभूत सुविधा आणि जागतिक स्पर्धेत स्थान मिळवण्याच्या संधींवर सविस्तर चर्चा केली. विशेषज्ञांच्या मते, योग्य नियोजन आणि गुंतवणुकीमुळे भारत लवकरच एआय क्षेत्रात जागतिक प्रभाव निर्माण करणारा देश बनू शकतो.
Powered By Sangraha 9.0