टेम्पोखाली पडून हृदयद्रावक मृत्यू; आत्महत्येचा धक्कादायक Video वायरल

20 Feb 2026 16:24:09
बारामती,  
baramati-morgaon-chowk-accident बारामती तालुक्यातील मोरगाव चौकात मंगळवारी धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास, गजबजलेल्या चौकात वाहतूक सुरळीत सुरू असताना एका अनोळखी व्यक्तीने आयशर टेम्पोच्या मागील चाकाखाली उडी मारून आत्महत्या केली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
 
baramati-morgaon-chowk-accident
 
प्रत्यक्षदर्शी म्हणाले की मृत व्यक्ती काही काळापासून चौक परिसरात संशयास्पद स्थितीत फिरत होता. कधी रस्त्याच्या कडेला उभा राहायचा, तर कधी वाहतूक पाहत होता. baramati-morgaon-chowk-accident त्याच्या वागण्यावरून अस्वस्थतेचा स्पष्ट अंदाज येत होता. घटनास्थळी आयशर टेम्पो हळूहळू पुढे जात असताना अचानक त्या व्यक्तीने टेम्पोच्या मागील चाकाखाली स्वतःला झोकून दिले. चालकाने तात्काळ ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, पण जोरदार धडकेमुळे व्यक्ती गंभीर जखमी झाला आणि काही क्षणांतच मृत्यू झाला. अपघातानंतर चौकात गोंधळ उडाला. नागरिकांनी तात्काळ पोलीस आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. बारामती तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी बारामती उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
सौजन्य : सोशल मीडिया 
Powered By Sangraha 9.0