अभ्यंकर नगरमध्ये विराट हिंदू संमेलन

20 Feb 2026 15:29:24
नागपूर,
Abhyankar Nagar अभ्यंकर नगर, माधवनगर आणि डोंगरे लेआउट यांच्या संयुक्त विद्यमाने सकल हिंदू समाजाच्या अंतर्गत शिवजयंतीच्या औचित्याने अभ्यंकर नगर झेंडा चौक येथे विराट हिंदू संमेलन पार पडले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता प्रकाश एदलाबादकर उपस्थित होते. तसेच माधव नगरचे उदय कानगे, अभ्यंकर नगरचे किरण गडकरी सर, नंदू भैया दुबे आणि सौ विजया पाध्ये यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
 
Abhyankar Nagar
 
एदलाबादकर यांनी आपल्या भाषणात शिवचरित्राच्या पैलूंवर प्रकाश टाकत, आजच्या काळात हिंदू धर्माच्या एकत्रीकरणासाठी समर्थ रामदासांनी सांगितलेल्या उपदेशाचे महत्त्व स्पष्ट केले. Abhyankar Nagar कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर विजय देशपांडे आणि आर्या देशपांडे यांनी शिवरायांची आरती सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ देवयानी केळकर यांनी केले आणि सांगता पसायदानाने करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले
सौजन्य: अभय चोरघडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0