रोबोटिक व स्टिम लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ!

20 Feb 2026 19:47:43
वर्धा, 
Inauguration of Robotics and STEAM Lab सध्याचे युग हे एआयचे आहे. नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भविष्याचे नियोजन करून रोबोटिक व स्टिम लॅब सुरू करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील पाच शाळांच्या अपग्रेडेशनचे काम हाती घेण्यात आले असून रोबोटिक व स्टिम लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. कर्वे समाज सेवा संस्था पुणे, कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क यांच्या संयुत वतीने बेंटलर ऑटोमोटिव्ह इंडिया प्रा. लि. यांच्या सीएसआर निधीतून नपच्या वसंत प्राथमिक शाळेत रोबोटिक व स्टिम लॅबचे उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री डॉ. भोयर बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, शिक्षण सभापती प्रियंका खंगार, बेंटलर ऑटोमोटिव्हचे व्यवस्थापकीय संचालक मुकुंद गणगणे, कर्वे समाज सेवा संस्थेचे डॉ. महेश ठाकूर, नगरसेवक सचिन होले, सोनल त्रिवेदी, युगांत कुंभलकर, मुध्याध्यापक प्रणीता आखतकर, डॉ. चंदू पोपटकर आदी उपस्थित होते.
 

Inauguration of Robotic 
 
कर्वे शिक्षण संस्था समाजसेवेचे काम करीत आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला शिक्षणासाठी पुढाकार घेतला, त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम सुरू आहे. वसंत प्राथमिक शाळेच्या नुतनीकरणासाठी १ कोटी २५ लाख निधी उपलब्ध करून दिला असल्याचे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले. रोबोटिक आणि स्टीम लॅब या शालेय आणि तांत्रिक शिक्षणातील आधुनिक प्रयोगशाळा आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून रोबोटिस, कोडिंग, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित शिकवतात. कोडिंग सॉफ्टवेअरचा वापर करून विद्यार्थी स्वतः रोबोट्स डिझाइन, प्रोग्राम तयार करतात त्यामुळे सर्जनशीलता, समस्या निवारण आणि भविष्यातील तांत्रिक कौशल्ये विकसित होण्यास मदत होते. यावेळी मुकुंद गणगणे व डॉ. महेश ठाकूर यांनीही मनोगत व्यत केले.
Powered By Sangraha 9.0