मुंबई,
Amitabh Bachchan बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि पापाराझींसोबतच्या वादांमुळे कायम चर्चेत असतात. सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी फोटो किंवा व्हिडिओ काढले जाणे त्यांना पसंत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात पुन्हा एकदा जया बच्चन यांनी पापाराझींवर नाराजी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. जया बच्चन काही महिलांसोबत गप्पा मारत उभ्या असताना छायाचित्रकारांनी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ टिपण्यास सुरुवात केली. हे पाहताच जया बच्चन संतापल्या आणि “बस, आता बस… ठीक आहे, आता बस,” असे म्हणत त्यांनी छायाचित्रकारांना सुनावले. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्टपणे जाणवत होता.दरम्यान, दिग्दर्शक-निर्माता करण जोहर तेथे आल्यावर त्यांनी जया बच्चन यांची भेट घेतली. दोघे संवाद साधत असताना पुन्हा एकदा पापाराझींनी त्यांचे छायाचित्र घेतले. जया बच्चन तिथून निघून गेल्यानंतर करण जोहर यांनी हलक्या फुलक्या अंदाजात, “माझ्यामुळे तुम्हाला फोटो मिळाला,” असे छायाचित्रकारांना सांगितल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जया बच्चन आणि पापाराझी Amitabh Bachchan यांच्यातील खटके नवीन नाहीत. यापूर्वीही त्यांनी छायाचित्रकारांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर हा ताजा प्रसंग पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल होत असतानाच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी उशिरा रात्री सोशल मीडियावर राग दर्शवणारे इमोजी पोस्ट केले. “आता चूप” असा उल्लेख असलेल्या या पोस्टमुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. अमिताभ बच्चन यांनी ही प्रतिक्रिया नेमकी कोणत्या संदर्भात दिली, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नसले तरी सोशल मीडियावर यावरून चर्चा रंगत आहेत.
सार्वजनिक आयुष्यातील व्यक्तींना सतत कॅमेऱ्यांच्या झोतात राहावे लागते, मात्र गोपनीयतेचा प्रश्नही अधोरेखित होत आहे. जया बच्चन यांच्या या प्रतिक्रियेमुळे सेलिब्रिटी आणि पापाराझी यांच्यातील नातेसंबंधांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.