घरातून बेपत्ता त्या मुलाचे अपहरण?

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
हिंगणघाट,
Kidnapping of missing child मोबाईल पाहण्यावरून आईने रागावल्याने घरून निघून जाणार्‍या १२ वर्षीय बालकाला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यत केल्याने स्थानिक पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद रमेश धुर्वे (१२) हा १४ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास नांदगाव येथील जे. आर. टेसटाईल्स कंपनीच्या क्वॉर्टरमधून घराबाहेर पडला. तो घरी परतला नसल्याने त्याची आई ललिता धुर्वे (३०) मूळ निवासी रा. मलाजखंड जि. बालाघाट (म.प्र.) ही सध्या जे.आर. टेसटाईल्स कंपनी क्वॉर्टर, नांदगाव, ता. हिंगणघाट येथे राहत आहे.
 
 

Kidnapping 
 
आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मोबाईल पाहण्याच्या सवयीवरून रागावल्यानंतर गोविंदने आता मोबाईलला हात लावणार नाही असे म्हणत घर सोडले. यापूर्वीही तो दोन वेळा रागाच्या भरात निघून गेला होता. यावेळी मात्र तो परतला नाही. त्याच्या आईने शोध घेतला असता काहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे आपल्या मुलाला फूस लावून पळवून नेल्याचा संशय त्याच्या आईने व्यत केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पद्माकर मुंडे करीत आहे.