लाडकी बहीण योजने हफ्ते मिळणार नाही...वाचा का?

20 Feb 2026 14:17:24
नवी दिल्ली,
Ladki Bhahin Yojana राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी आधार ठरत असली तरी लाभ वितरणातील तांत्रिक अटींमुळे काही लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. महिलांना स्वावलंबी बनवणे आणि कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. मात्र लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे अनेकांचे हप्ते रखडले आहेत.
 
ladki bahin
 
सरकारने बनावट अर्ज रोखण्यासाठी आणि लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी ओळख पडताळणी अनिवार्य केली आहे. या प्रक्रियेत आधार क्रमांक, बँक खाते आणि मोबाईल क्रमांकाची खातरजमा केली जाते. परंतु ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा नसणे, तांत्रिक अडथळे, आधार आणि बँक खात्याची जोडणी न झालेली असणे तसेच संदेश क्रमांक मिळण्यात येणारे अडथळे यामुळे अनेक महिलांना प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. परिणामी नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
या पार्श्वभूमीवर सरकारने ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून आता ही अंतिम तारीख ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, ज्या महिलांनी पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांचे रखडलेले हप्ते लगेचच खात्यात जमा होतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र महिला व बालकल्याण विभागाच्या स्पष्टीकरणानुसार, प्रक्रिया पूर्ण झालेल्या अर्जांची पुन्हा एकदा तपासणी केली जाणार आहे. अंतिम मान्यता मिळाल्यानंतरच थकबाकीचे हप्ते जमा केले जातील. त्यामुळे तात्काळ रक्कम मिळण्याची शक्यता कमी असून ३१ मार्चनंतरच पुढील कार्यवाही होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी लाभार्थी महिलांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Powered By Sangraha 9.0