मंत्री नरहरी झिरवाळ यांचा मोठा निर्णय

खासगी सचिव रामदास गाडे यांना केले कार्यमुक्त

    दिनांक :20-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Narahari Zirwal, मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणात महत्त्वाचे घडामोडी घडत असून अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपल्या खासगी सचिवांना पदावरून कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे, या प्रकरणात अटक झालेल्या कर्मचाऱ्याच्या चौकशीत सचिवांचे नाव समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
 

Narahari Zirwal, 
 
 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंत्रालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाती अटक केली. या कारवाईनंतर मंत्रालयात एकच खळबळ उडाली. चौकशीदरम्यान ढेरिंगे याने मंत्र्यांच्या कार्यालयातील काही वरिष्ठांचे नाव घेतल्याची माहिती समोर आली.
या पार्श्वभूमीवर मंत्री झिरवाळ यांनी आपल्या स्वीय सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या डॉ. रामदास गाडे यांना तात्काळ कार्यमुक्त केले असून त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आली आहे. गाडे यांना त्यांच्या मूळ कृषि व पशुपालन विभागात परत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.मंत्री झिरवाळ यांनी या प्रकरणात पारदर्शकतेची भूमिका घेतली असून, चौकशीत आपला कोणताही संबंध आढळल्यास जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी या घटनेवरून सरकारवर टीका करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणामुळे प्रशासनातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, ACB कडून पुढील तपास सुरू आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.